भारताची बॉक्सिंगपटू मेरी कोमचा जीवनप्रवास तीन मिनिटांच्या जाहिरातीद्वारे पडद्यावर साकारण्याचे काम चित्रपटनिर्माता सुजित सरकारने साधले आहे. मागील आठवड्यातच करण्यात आलेल्या या जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान मेरी कोमने कॅमे-यासमोर आपला जीवनप्रवास मांडला. तीन दिवस चाललेल्या या जाहिरातीच्या चित्रीकरणाचे दिवस आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण काळ असल्याचे सुजित सरकारने सांगितले. मेरी कोमच्या आयुष्यातील बालवयातील संघर्षापासून ते आजपर्यंतच्या प्रवासातील प्रत्येक टप्पा या जाहिरातीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही केला. मेरीचा संपूर्ण जीवनप्रवास तीन मिनिटांच्या कालावधीत पडद्यावर साकारण्यासाठी आम्हाला बरेच कष्ट घ्यावे लागल्याचे सुजित सरकारने स्पष्ट केले. मेरी कोम हिच्या बालपणातील गरिबीपासून ते आजवरच्या जागतिक स्तरावर खेळांडूसाठी एक आदर्श ठरल्याचा रोमांचक प्रवास चित्रपटातूनसुद्धा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्रा मेरी कोमची भूमिका साकारणार आहे.
बॉक्सिंगपटू मेरी कोमचा जीवनप्रवास तीन मिनिटांत उलगडणार
भारताची बॉक्सिंगपटू मेरी कोमचा जीवनप्रवास तीन मिनिटांच्या जाहिरातीद्वारे पडद्यावर साकारण्याचे काम चित्रपटनिर्माता सुजित सरकारने साधले आहे.
First published on: 14-03-2014 at 06:34 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mary kom shoots her life story in 3 minutes