आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांची वारी केल्यानंतर चित्रपट भारतात प्रदर्शित करण्याचा नवा पायंडा भारतीय चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांपासून पहायला मिळत आहे. यंदाच्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मेरी कोम’ या चित्रपटाचा प्रिमियर आयोजित करण्यात आल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यामुळे प्रियांका चोप्राची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘मेरी कोम’चा प्रिमियर आंतरराष्ट्रीय पातळवीर दणक्यात साजरा होणार यात काही शंका नाही. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदाचे ३९वे वर्ष असून ४सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. भारतीय बॉक्सिंगपटू मेरी कोम हिचा संघर्षपूर्ण आणि खडतर जीवनप्रवास ‘मेरी कोम’ या चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर साकारण्यात आला आहे. आतापर्यंत ग्लॅमरस चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारी बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा या चित्रपटाच्या माध्यमातून एका नव्या अवतारात पहायला मिळेल. मेरी कोमची भूमिका साकारण्यासाठी प्रियांकाने प्रचंड मेहनत घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मेरी कोम’चा प्रिमियर
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांची वारी केल्यानंतर चित्रपट भारतात प्रदर्शित करण्याचा नवा पायंडा भारतीय चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांपासून पहायला मिळत आहे.
आणखी वाचा
First published on: 23-07-2014 at 01:29 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mary kom to have world premiere at tiff