बॉलीवूड दिवा प्रियांका चोप्राच्या आगामी ‘मेरी कोम’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर २४ जुलैला प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रियांकाच्या वाढदिवसादिवशी १८ तारखेला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरला प्रशंसा करणा-या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. ओमंग कुमारचे दिग्दर्शन आणि वायकॉम १८ व संजय लीला भन्सालीची संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपलटात प्रियांका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटात प्रियांका सुप्रसिद्ध मुष्ठियोद्धा ‘मेरी कोम’ची भूमिका साकारत आहे. मंगळवारी खुद्द प्रियांकाने या चित्रपटाचे दोन पोस्टर्स आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले होते. या पोस्टर्समधील प्रियांकाच्या मुष्ठियोद्धा ‘लूक’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Story img Loader