२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध सामना जिंकत क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू विवान रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ताने देखील पाहिला आहे. तो पाहिल्यावर तिने पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
मसाबाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने वडिलांचा लॉर्ड्सच्या मैदानात खेळतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर ‘माझ्या वडिलांना स्टेडियममध्ये कधीही खेळताना न पाहणे ही माझी जीवनातील सर्वात मोठी खंत आहे. मी खूप लहान होते. मी नेहमी म्हणते की माझा जन्म ६ वर्षांनी, खूप उशीरा झाला. मला हा प्रतिष्ठित सामना बघायला मिळाला नाही. माझा देश एका बाजूला आणि माझे वडील एका बाजूला’ या आशायचे कॅप्शन तिने फोटोवर दिले आहे.
‘मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही’, भगवद् गीता वाचणाऱ्या उर्फी जावेदचा धक्कादायक खुलासा
रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘८३’ हा चित्रपट भारताचे माजी क्रिकेट कर्णधार कपिल देव यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाची कथा ही भारतानं १९८३ साली मिळवलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणनं रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची म्हणजेच कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळली आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.