अभिनेत्री नीना गुप्ता गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. एकीकडे नीना गुप्ता वेब सिरीज आणि सिनेमांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंज करत आहेत. तर आता दुसऱीकडे नीना गुप्ता यांनी त्यांचं आत्मचरित्र ”सच कहूं तो’ प्रकाशित केलं आहे. या पुस्तकात नीना गुप्ता यांनी अनेक खासगी गोष्टींचा खुलासा केलाय. यानंतर आता मुलगी मसाबा गुप्ताने नीना गुप्ता यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केलाय.
मसाबा गुप्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नीना गुप्ता यांचा करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एका जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत नीना गुप्ता एका गाण्यावर प्रेशर कुकरची जाहिरात करताना दिसत आहेत. नीना गुप्ता यांनी साडी परिधान केली असून केसात गजरा माळला. अनेक वर्षांपूर्वीच्या या व्हिडीओत नीना गुप्ता खूपच तरुण दिसत आहेत. अगदी हटके अंदाजातील ही जाहिरात शेअर करताना मसाबाला हसू आवरलेलं नाही. या व्हिडीओसोबत मसाबाने एक धमाल कॅप्शन देत आई नीना गुप्ताला एक विनंती केलीय.
View this post on Instagram
मसाबा कॅप्शनमध्ये म्हणाली, “पुढच्या वेळी जेव्हा मी जेवायला येईल तेव्हा अगदी अशाच प्रकारच्या परफॉर्मन्सची अपेक्षा आहे.” मसाबाच्या या व्हिडीओला अनेक सेलिब्रिटींनी पसंती दिलीय. तर नीना गुप्तादेखईल स्वत: हा व्हिडीओ पाहून थक्क झाल्या. नीना गुप्ता यांनी मसाबाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर “हे भगवान” अशी कमेंट केलीय. तसचं अभिनेत्री रिचा चढ्ढा, नेहा पेंडसे आणि मिनी माथुरने देखील या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.
नीना गुप्ता यांनी त्यांच्या ‘सच कहूं तो’ या पुस्तकात त्यांच्या संघर्षाचा खुलासा केलाय. लग्न न करताच आई होणं, एकटीने मुलीचा सांभाळ करणं ते बॉलिवूडमधील अनुभव त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत.