बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली. मसाबा ही सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता व विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. मसाबाने अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्नगाठ बांधली. त्यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. तिच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र मसाबाने लग्नादरम्यान केलेली एक चूक तिला महागात पडली आहे. तिने पोस्ट शेअर करत याबाबत भाष्य केले आहे.

मसाबा गुप्ताने अलीकडेच तिचा प्रियकर अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले. लग्न झाल्यापासून मसाबा सतत चर्चेत असते. सत्यदीप व मसाबा दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. नुकतंच मसाबा गुप्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लग्नादरम्यान केलेली एक चूक तिला कशाप्रकारे महागात पडली आहे, याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : वडिलांसमोर मसाबा गुप्ताने पतीला केलं लिपलॉक, नेटकरी संतापून म्हणाले; “भारतीय संस्कृती…”

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
online fraud of Rs 57 lakhs with senior citizen women on pretext of extra returns
जादा परताव्याच्या अमिषाने वृद्धेची ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे ५७ लाखांची फसवणूक
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

मसाबाने नुकतंच इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. यात ती म्हणाली, मी लग्नापूर्वी महिनाभर साखरचे पदार्थ खाणं बंद केलं होतं आणि लग्नाच्या दिवशी तिने फक्त लग्नाचा केक खाल्ला. त्यामुळे आता तिच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात पिंपल्स आले आहेत. पिंपल्ससाठी गोड खाणं खरंच धोकादायक आहे. ते खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात. विशेष म्हणजे मसाबाने अनेक चाहत्यांना स्किन केअर टिप्सही दिल्या आहेत.

“आठवड्यातून एकापेक्षा अधिक वेळा साखरयुक्त पदार्थ खाऊ नका. मी माझा दिवस साखरेविना सुरु करते. हो कारण साखरेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि हा विनोद असू शकत नाही. त्याबरोबरच जास्त ताण, अवेळी खाणं आणि दैनंदिन दिनचर्या बदलल्यामुळे माझ्या त्वचेची ही अवस्था झाली आहे. तणाव हा विनोद नाही, याचा तुमच्यावर परिणाम नक्की होतो. त्यामुळे शांत राहा” असे मसाबाने दिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “मी, माझा पती, मुलीचे वडील अन्…” मसाबाच्या लग्नानंतर ‘तो’ फोटो शेअर करत नीना गुप्ता यांनी दिलेलं कॅप्शन चर्चेत

दरम्यान, मसाबा व सत्यदीप गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना रिलेशनशिपमध्ये होते. मसाबाचं पहिलं लग्न मधू मंटेनाशी झालं होतं. पण काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आता सत्यदीपबरोबर संसार थाटत मसाबाने नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

Story img Loader