आपल्या भारतात विविध प्रकारचे रिअॅलिटी प्रसारित होत असतात. नृत्य, गाणे, अभिनय, कॉमेडी यांसारखा विविध गोष्टींसाठी रिअॅलिटी शो अनेकदा चर्चेत असतात. पण आता लवकरच ज्यांना स्वयंपाकाची आवड आहे, विविध पदार्थ बनवण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी मास्टर शेफ इंडिया लवकरच सुरु होणार आहे. भारताचा सर्वात लाडका कुकिंग रिअॅलिटी शो म्हणून मास्टर शेफ इंडियाला ओळखले जाते. हा शो लवकरच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या कार्यक्रमाच्या ऑडिशनला सुरुवात होणार आहे. नुकतंच या कार्यक्रमासाठी ऑडिशनच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मास्टर शेफ इंडिया हे नाव जरी ऐकले तरी आपल्या डोळ्यासमोर छान छान पदार्थ उभे राहतात. आता लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच भारताच्या मास्टर शेफला शोधण्याची मोहीम सुरु केली जाणार आहे. यासाठी कोलकातामधून ऑडिशनची सुरुवात होणार आहे. आता लवकरच मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली इथे या प्रवेशफेऱ्या पार पडणार आहेत.
आणखी वाचा : तब्बल २ वर्षांनी ‘आम्ही सारे खवय्ये’ प्रेक्षकांच्या भेटीला; तारीख, वेळ आणि सूत्रसंचालकही ठरले

जर तुमच्या ध्यानी, मनी, स्वप्नी फक्त आणि फक्त खाद्यपदार्थांची पंगत असेल आणि तुमचे आयुष्य पाककृतींच्या अवतीभोवती फिरत असेल तर तुम्ही नक्कीच या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. यासाठी येत्या २४ सप्टेंबर, १५ ऑक्टोबर आणि ८ ऑक्टोबरला तुमच्या जवळच्या शहरात हे ऑडिशन पार पडणार आहेत.

संपूर्ण वेळापत्रक

  • कोलकाता : २४ सप्टेंबर, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, पी-१६, तारातला रोड, सीपीटी कॉलनी, अलीपोर, कोलकाता, पश्चिम बंगाल ७०००८८
  • दिल्‍ली : १ ऑक्‍टोबर, हॅप्‍पी मॉडेल स्‍कूल, बी २, जनकपुरी, नवी दिल्‍ली ११००५८
  • मुंबई : १५ ऑक्टोबर, रायन इंटरनॅशनल स्कूल, वास्तू पार्क, ऑफ लिंकिंग रोड, मालाड, एव्हरशाइन नगर, मालाड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०००६४
  • हैदराबाद : ६ ऑक्टोबर, सेंट अॅन्स कॉलेज फॉर विमेन, ए/७५, सेंट अॅन्स रोड, संतोष नगर, मेहदीपटनम, हैदराबाद, तेलंगणा ५०००२८

आणखी वाचा : राणादाची लगीन घाई, हार्दिक जोशीच्या केळवणाचे फोटो समोर, ‘या’ व्यक्तीच्या घरातून केली सुरुवात

विविध शहरांतील ऑडिशन्स पूर्ण झाल्यानंतर त्यातील निवडक शेफची या शोसाठी निवड केली जाणार आहे. यानंतर प्रत्यक्ष शोमध्ये देशभरातील शेफ स्पर्धेसाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Masterchef india season 7 auditions to commence on this date in mumbai delhi and many city full timetable nrp