‘बॉय मीट्स वर्ल्ड’ या लोकप्रिय सिटकॉम शोमध्ये झळकलेला अमेरिकन अभिनेता मॅथ्यू लॉरेन्स हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. मॅथ्यूने एका ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकावर लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. इतकंच नाही तर लोकप्रिय अशा मार्वल कॉमिकच्या चित्रपटांच्या सीरिजमध्ये काम देण्यासाठी याच दिग्दर्शकाने आपल्याकडे स्ट्रिपिंग (कपडे काढून नाचण्याची) मागणीदेखील केल्याचं अभिनेत्याने स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच स्वतःच्या पॉडकास्ट ‘ब्रदरली लव्ह’मध्ये त्याने या सगळ्याचा खुलासा केला आहे. अमेरिकेतील ‘मीटू’ चळवळीला समर्थन देत त्याने स्वतःचा अनुभव शेअर केला आहे. केवळ पुरुषच नव्हे तर महिलांचाही यात समावेश असल्याचं मॅथ्यूने सांगितलं आहे. मॅथ्यूने त्या दिग्दर्शकाच्या मागणीला विरोध दर्शवल्याने त्याच्या एजन्सितूनही बाहेर पडावं लागलं.

आणखी वाचा : ७२ व्या वर्षीही सुपरहीट चित्रपट देणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांचा लेक मात्र ठरला सुपरफ्लॉप; पहिल्याच चित्रपटाने कमावले ‘इतके’ रुपये

मॅथ्यूने त्या दिग्दर्शकाचं नाव आणि इतर माहिती न सांगता याबद्दल खुलासा. त्या दिग्दर्शकाने मॅथ्यूला एका हॉटेल रूममध्ये बोलावलं अन् मार्वलच्या आगामी चित्रपटात एक प्रमुख भूमिका देऊ करून त्याने मॅथ्यूकडे कपडे काढण्याची मागणी केली होती. मॅथ्यू त्या खोलीतून बाहेर पडला त्यामुळे त्याच्या एजन्सिने त्याला काढून टाकलं.

ही गोष्ट बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडली आहे असं मॅथ्यूचं म्हणणं आहे. आपल्या काही मित्रांची उदाहरणंही त्याने या पॉडकास्टमध्ये दिलेली आहेत. याबरोबर आपल्या समाजाचा पुरुषांकडे बघायचा दृष्टिकोनाबद्दलही त्याने यात भाष्य केलं आहे. लैंगिक छळ हा एक गंभीर गुन्हा आहे, आता मॅथ्यू लॉरेन्सने केलेल्या वक्तव्यानंतर त्या दिग्दर्शकावर कारवाई होणार की नाही याचा आपल्यासमोर भविष्यात उलगडा होईलच.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matthew lawrence alleges sexual harassment by oscar winning director avn
Show comments