‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील परी म्हणजे मायरा वायकुळ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही असंच काहीसं घडलंय. मायरा म्हणजे परीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालतोय. ज्यात ती ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील ‘ढोलिडा’ या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसत आहे.
मायराचा हा डान्स व्हिडीओ झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवरून शेअर करण्याता आला असून या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा असलेली पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये मायरा निळ्या रंगाच्या साडीत खूपच गोड दिसत आहे. लहानग्या मायराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये मायरा आलिया भट्टच्या ‘ढोलिडा’ या गाण्यावर अगदी हुबेहुब डान्स करताना दिसत आहे. ती साडी नेसून आलियासारख्या डान्स स्टेप सहजपणे करताना दिसत आहे. त्यामुळे तिचं सोशल मीडियावर कौतुकही होताना दिसत आहे. अनेक युजर्सनी मायराच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.
दरम्यान ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत मायरा वायकुळनं परीची म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या मुलीची भूमिका साकारली आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे जरी मुख्य भूमिकेत असले तरी सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा मात्र मायराचीच होताना दिसते. तिचा निरागसपणा आणि गोड हसू यावर प्रेक्षक फिदा आहेत. सोशल मीडियावर मायराचा बराच मोठा चाहतावर्ग आहे.