झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा ही चमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. या चिमुकलीने परी अनेकांच्या मनात घर केले आहे. या छोट्याशा परीचा बिग बॉस विजेता शिव ठाकरेही चाहता झाला आहे. त्या दोघांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परीची भूमिका साकारणारी मायरा ही घराघरात लोकप्रिय आहे. तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. फक्त सर्वसामान्य नव्हे तर अनेक सेलिब्रिटीही तिचे चाहते आहेत. बिग बॉस २ पर्वाचा विजेता शिव ठाकरे हा देखील परीचा फार मोठा चाहता आहे. नुकतंच एका कार्यक्रमात परी आणि शिवची भेट झाली. यावेळीचा एक व्हिडीओ मायराच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओत मायरा आणि बिग बॉस विजेता शिव ठाकरे दोघेही पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओला हिंदी चित्रपटातील ‘इत्ती सी हसी, इत्ती सी खुशी’ हे गाणे बॅकग्राऊंडला वाजताना दिसत आहे. यात शिव हा गुडघ्यावर बसून छोट्या मायरासोबत गप्पा मारताना दिसत आहे. तसेच ते दोघे एकमेकांना टाळ्याही देताना दिसत आहे. यात तो परीचे छान कौतुक करत तिच्यासोबत फोटोही काढताना दिसत आहे. मायरा आणि शिवचा हा व्हिडीओ त्या दोघांच्याही इन्स्टाग्रामला पाहायला मिळत आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

‘…त्यावेळी मलाही राग यायचा’, तब्बल १७ वर्षांनी पंकज त्रिपाठींनी सांगितली संघर्षगाथा

दरम्यान ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. श्रेयस आणि प्रार्थना या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा म्हणजेच परी ही चिमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे यांच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी, अजित केळकर या कलाकारांमुळे मालिकेचा चार चांद लागले आहेत.

Story img Loader