झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर, मायरा यांसह सर्व कलाकारांमुळे चार चांद लागले आहेत. सध्या या मालिकेत नेहा आणि यशच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. त्यामुळे नेहा आणि यशच्या नव्या नात्याला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे मालिकेत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नुकतंच ‘माझी तुझी रेशीमगाठ’या मालिकेतील विवाह विशेष भाग तांत्रिक अडचणींमुळे अर्धवट दाखवण्यात आला होता. मात्र आज तो पुन्हा एकदा प्रसारित केला जाणार आहे.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील नेहा आणि यशच्या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. काल रविवारी १२ जून रोजी नेहा आणि यशच्या लग्नाचा विशेष सोहळ्याचा भाग प्रसारित करण्यात आला. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे तो भाग अर्धवट दाखवण्यात आला. त्यानंतर नुकतंच अभिनेत्री प्रार्थना बेहरेने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने काल अर्धवट प्रसारित झालेला विवाह विशेष भाग आज पुन्हा दाखवण्यात येणार आहे, असे सांगितले आहे.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून प्रार्थना बेहरेने घेतला ब्रेक, कारण आले समोर

“काही तांत्रिक अडचणींमुळे माझी तुझी रेशीमगाठच्या आजच्या विशेष भागात व्यत्यय आला.. त्याबद्दल क्षमस्व. पण तुम्हा रसिकांसाठी हाच आनंद सोहळा आम्ही आज १३ जून रोजी सकाळी १० वा. आणि दुपारी ४ वा. पुन्हा एकदा दाखवणार आहोत…. त्यामुळे पाहायला विसरु नका. नेहा आणि यशच्या लग्नाचा आनंद सोहळा फक्त झी मराठीवर”, असे निवेदन झी मराठीने दिले आहे. याच निवेदनाचा एक फोटो प्रार्थनाने शेअर केला आहे.

प्रार्थनाने या फोटोला कॅप्शन देताना सर्वांची माफीही मागितली आहे. “माफी असावी, माफी असावी, माफी असावी, पुन्हा आमच्या मालिकेचा भाग पाहा आणि तुमच्या अविरत प्रेमासाठी धन्यवाद”, असे प्रार्थनाने म्हटले आहे.

“आता मागे न पाहता पुढे जाणे गरजेचे”, प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान सध्या या मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. नेहा आणि यशच्या लग्नात तिच्या पहिल्या नवऱ्याची एंट्री होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नात विघ्न येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच नेहाच्या पहिल्या नवऱ्याची भूमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या ट्विस्टमुळे या मालिकेविषय़ी असलेली प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

Story img Loader