झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमुळे बालकलाकार मायरा वायकुळ घराघरांत पोहोचली. आता तर ती सगळ्यांचीच लाडकी झाली आहे. मायराचं बोलणं, तिचं हसणं सगळं काही प्रेक्षकांना आवडतं. अगदी लहान वयात ती करत असलेला अभिनय तर कौतुकास्पदच आहे. सोशल मीडियावरही तिचे बरेच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. आता असाच एक मायराचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधणाऱ्या ‘पावनखिंड’मधील अभिनेत्याचा गृहप्रवेश, शेअर केली खास पोस्ट
मायराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या ‘पांडू’ चित्रपटामधील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मायरा चक्क एअरपोर्टवर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मायराच्या चेहऱ्यावरील हावभाव तसेच डान्स पाहून नेटकरीही भारावले आहेत.
इतकंच नव्हे तर डान्स करताना ती गाणं सुद्धा बोलत आहे. काही तासांमध्येच हा व्हिडीओ २० हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबरीने अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून मायराचं कौतुक देखील केलं आहे. मायराच्या प्रत्येक रिल व्हिडीओला तर नेटकरी भरभरुन पसंती देतात.
आणखी वाचा – VIDEO : पूजा सावंतने खरेदी केलं नवीन घर, जवळच्या मित्राने शेअर केला व्हिडीओ
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेने अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावलं आहे. लहान मुलांची निरागसता, प्रेमळ स्वभाव अनेकांच्या मनावर जादू करतात ते या मालिकेतून प्रेक्षकांना अनुभवायला मिळतं. तसेच चिमुकली मायरा फक्त चार वर्षांची आहे.