झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतून प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्या दोघांप्रमाणेच ‘परी’ची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार मायरा वायकुळ हिचेही कौतुक झाले. नुकतीच ती एका जाहिरात झळकली आहे.
परीने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. तिचे आज अनेक चाहते आहेत. मालिका जरी संपली असली तरी आता परी हिंदी जाहिरातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीत मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील आहे. ही जाहिरात एका चहाची विक्री करणाऱ्या कंपनीची आहे. २६ जानेवारीचे औचित्य साधून एक सैनिक आणि त्याच्या कुटुंबाची गोष्ट जाहिरातीत दाखवण्यात आली आहे. या जाहिरातीत अमृता खानविलकर आणि मायरा आई मुलीच्या भूमिकेत दिसत आहेत.
“अजूनही वेदना…” अपघातानंतर ‘तारक मेहता..’ फेम मुनमुन दत्ताने शेअर केली पोस्ट
मराठीतील सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. अमृताने आज आणखीन एक मोठी घोषणा केली आहे. प्रसिध्द धावपटू आणि माण तालुक्यातील मोही गावची सुकन्या ललिता बाबर यांच्या जीवनावर लवकरच एक वेबसीरीज प्रदर्शित होणार आहे. यात ललिता बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर झळकणार आहे.
मायरा सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते, तिच्या डान्स व्हिडीओला पसंती मिळते. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये तिच्या आईबरोबर दिसत असून त्या दोघी रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ या गाण्यावर थिरकल्या आहेत.