मराठी मालिका विश्वात अवघ्या काही वेळातच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणाऱ्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनाच कायमचं घर करुन गेलं. त्यातीलच एक नाव म्हणजे रसिका सुनील, अर्थात सर्वांची लाडकी शनाया. गुरुनाथच्या प्रेमात असणाशी, काहीशी बालिश वागणारी, एखाद्या लहान मुलीप्रमाणे हट्ट करणारी आणि असंख्य चुका करणारी, त्याच चुकांमुळे अडचणींमध्ये सापडणाऱ्या शनायाने उच्च शिक्षण घेण्याच्या कारणास्तव मालिका सोडली. रसिका सध्या परदेशात अभिनयात उच्च शिक्षण घेत आहे. त्याचसोबत ती आता चक्क विमान उडवायचे धडे गिरवतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रसिकाने इन्स्टाग्रामवर याविषयीचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती विमान उडवताना दिसत आहे. ‘होय.. तुम्ही जे पाहताय ते खरं आहे. मी विमान उडवलं आहे. यातून घेतलेला पहिला धडा म्हणजे, उंचीवरून हे जग अद्भुत दिसतं, पण तुम्ही जितके उंचावर जाता तितकंच तुम्हाला जबाबदार व्हावं लागतं,’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

Video : तीन वर्षांनंतर रणबीर-दीपिका एकत्र

मालिकेमुळे रसिकाची लोकप्रियता इतकी वाढली की तिच्या छोट्याछोट्या गोष्टी जाणून घेण्याचीही चाहत्यांना फार उत्सुकता असते. परदेशात असली तरीही रसिकाने चाहत्यांसोबतचं नातं कायम जोडून ठेवलं आहे. सोशल मीडियाद्वारे ती अनेकदा चाहत्यांशी संवाद साधते.