‘जय जय महाराष्ट्र’ अशी साद घालत महाराष्ट्राची समृद्ध शाहिरी परंपरा आणि लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या शाहीर साबळे यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वेगळ्या प्रकारे आदरांजली देण्याचा निर्णय त्यांचे नातू दिग्दर्शक केदार शिंदे यांनी घेतला आहे. शाहिरांच्या आठवणी जागवणाऱ्या ‘मी आणि शाहीर साबळे’ या कार्यक्रमाचे खास प्रयोग करण्यात येणार आहेत.
‘मी आणि शाहीर साबळे’ या कार्यक्रमात केदार शिंदे यांना नाटय़दिग्दर्शक संतोष पवार आणि अभिनेता भरत जाधव यांच्याबरोबरच प्रसेनजीत कोसंबी, रोहित राऊत आणि सायली पंकज या गायकांची साथ लाभणार आहे. ‘झी नाटय़गौरव’ सोहळ्यात हाच कार्यक्रम संक्षिप्त रुपात सादर करण्यात आला होता. आता ३१ जुलैला गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर १ तास ४५ मिनिटे एवढय़ा दीर्घ स्वरूपात ‘मी आणि शाहीर साबळे’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे तीन विशेष प्रयोग होणार असून ३१ जुलैला ठाण्यात ‘गडकरी रंगायतन’मध्ये दुपारी साडेचार वाजता, १ ऑगस्टला कल्याणच्या ‘अत्रे रंगमंदिर’मध्ये रात्री साडेआठ वाजता आणि २ ऑगस्टला ‘शिवाजी मंदिर’मध्ये रात्री आठ वाजता हे प्रयोग होणार आहेत.
शाहिरांच्या आठवणी केदार शिंदे जागवणार
‘जय जय महाराष्ट्र’ अशी साद घालत महाराष्ट्राची समृद्ध शाहिरी परंपरा आणि लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या शाहीर साबळे यांना गुरुपौर्णिमेच्या
First published on: 21-07-2015 at 07:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Me ani shahir sabale programme by kedar shinde