राज्यातलं राजकारण गेल्या महिन्याभरापासून चांगलंच चर्चेत राहिलं. राज्यात सत्तांतर झालं आणि उद्धव ठाकरेंच्या जागी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. हे सत्तानाट्य सुरू असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती. पण झालं वेगळंच. याच सगळ्या राजकीय घडामोडींवर आधारित ‘मी पुन्हा येईन’ वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये ‘मी पुन्हा येईन’बाबत उत्सुकता आणखीनच वाढली होती.
आणखी वाचा – वाघाची डरकाळी, रिक्षाचा हॉर्न अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संबंध काय? दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात…
नुकतंच ‘मी पुन्हा येईन’चे तीन भाग प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. या तीन भागांना मिळालेला प्रतिसाद पाहून सीरिजचे पुढील भाग प्रदर्शित करण्यात येतील. ‘मी पुन्हा येईन’मध्ये विनवण्या, सत्तानाट्य, मंत्रीपदासाठी राजकारण्यांची फसवणूक, आमदारांची पळवापळवी असे अनेक मुद्दे विनोदी शैलीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सीरिजचे तीन भाग प्रदर्शित झाल्यानंतर पुढील भागांमध्ये काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
या वेबसीरिजचे दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, “सध्याच्या राजकारणाशी याचा काहीही संबंध नसून निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने याची निर्मिती करण्यात आली आहे. राजकारणामागील गोष्टी या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील.” राजकारणामध्ये कधीही काहीही घडू शकते हे या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
आणखी वाचा – कारमध्ये शरीरसंबंध ते थ्रीसम, विजय देवरकोंडाचे सेक्स लाइफबद्दल खुलासे
रविंद जगताप लिखित, दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘मी पुन्हा येईन’ची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे.