सुभाष घई, रजत कपूर, विकास बहल, सुभाष कपूरनंतर आता आणखी एका दिग्दर्शकावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाले आहे. ‘हे बेबी’, ‘हाऊस फुल’, ‘हमशकल’ यांसारख्या चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खान याच्यावरदेखील एका अभिनेत्रीनं लैंगिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहे. यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडची आणखी एक काळी बाजू समोर आली आहे. अभिनेत्री सलोनी चोप्रा हिनं साजिद खान कित्येक महिने आपला मानसिक आणि लैंगिक छळ करत असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलोनी चोप्रानं लिहिलेली पोस्ट-
‘या इंडस्ट्रीत कोणेकाळी मी साजिद खानची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम पाहिलं. साजिद यांच्यासोबत मी जो काळ व्यतीत केला आणि त्यातून मला जो अनुभव आला तो मानसिकदृष्या खचवणारा होता. साजिद रात्री अपरात्री मला फोन करायचा. माझ्याशी अश्लिल बोलायचा. मी त्याच्या हाताखाली काम करते त्यामुळे मी त्याचं ऐकणं भागच आहे असं तो मला सांगत राहायचा. माझी मुलाखत घेताना त्यानं मला काही अश्लील प्रश्न विचारले होते.

२०११ मध्ये मला हे सगळे वाईट अनुभव आले. रात्री बेरात्री फोन करून कामाव्यतिरिक्त माझ्याशी घाणेरडे संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. मी फोन घेतले नाही की असभ्य भाषेत मला तो ऐकवायचा. मी अनाकर्षक दिसते त्यामुळे या क्षेत्रात मला कोणीही काम देणार नाही असं सांगून दररोज माझं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न त्यानं केला. कित्येकदा फोन करून तो माझ्याकडे अश्लिल फोटोंची मागणी करायचा. अभिनेत्री व्हायचं असेल तर बिकीनीमधले फोटो मला पाठव असंही फोन करून मला सांगायचा. त्याच्यासोबत काम करत असताना अनेकदा तो मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचा. त्याच्या गुप्तांगाला स्पर्श करायला लावायचा. माझ्यासाठी सारचं किळसवाणं होतं.

दिवसेंदिवस त्यांच्या वागण्याचा मला अधिकच त्रास होत होता. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दलही तो माझ्याकडे वाईट बोलायचा. त्याची एक्स गर्लफ्रेंड ही मी आतापर्यंत पाहिलेली या क्षेत्रातली एक उत्तम अभिनेत्री होती. त्याच्या खासगी जीवनातील नको त्या गोष्टीही तो मला सांगायचा. एका अभिनेत्रीला त्यानं माझ्यासमोर स्कर्ट वर करायला लावला होता, त्यानंतर ती खूपच अनाकर्षक दिसते आणि अभिनेत्री होण्याचे कोणतेही गुण तिच्यात नाही असं सांगत साजिदनं तिचा खूप अपमान केला. त्यानंतर मला बाहेर काढून त्यानं दार लावून घेतलं. पुढे त्यानं तिच्यासोबत जे काही केलं याची कल्पनाही मला करवत नाही.

तो सांगेल ते काम मी करावं आणि त्याचसोबत त्याला शारीरिक सुखही पुरवावं अशी मागणी तो सारखी करायचा. माझं करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी त्यानं मला दिली होती. मी त्याकाळात प्रचंड मानसिक धक्क्यातून गेले, माझ्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवायला मला ७ वर्षे लागली. त्यानं असंख्य मुलींवर असाच अत्याचार केला असणार याची मला खात्री आहे.’

यासारखे अनेक कटु अनुभवांना तिनं वाट मोकळी करून दिली. सलोनीच्या धक्कादायक आरोपानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड पुन्हा एकदा हादरून गेलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Me too in bollywood saloni chopra accuses sajid khan of sexual harassment