जिओ स्टुडिओज या ओटीटी वाहिनीवर मराठी चित्रपटांच्या डिजिटल वल्र्ड प्रीमियरची सुरुवात ‘मी वसंतराव’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाने होणार आहे. २१ मे रोजी जिओ सिनेमावर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे. भारतासह जगभरातून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक दाद मिळाली होती. तसेच, ९५ व्या ऑस्करसाठी जगभरातील ३०१ चित्रपटांची वेगळी यादी जाहीर केली होती, त्यातही ‘मी वसंतराव’  या चित्रपटाचाही समावेश होता. चित्रपटगृहात प्रेक्षकांची मने जिंकणारा ‘मी वसंतराव’ चित्रपट ओटीटी वाहिनीवरून जगभरातील प्रेक्षक पाहू शकणार असल्याचा आनंद प्रसिद्ध गायक – अभिनेते राहुल देशपांडे यांनी व्यक्त केला. तसेच, या कामाची दखल जागतिक पातळीवर घेत जिओच्या मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या मालिकेत ‘मी वसंतराव’ चित्रपटाची प्रथम निवड केल्याबद्दल जिओचे देशपांडेंनी आभारदेखील मानले. 

काही महिन्यांपूर्वी जिओ स्टुडिओजने देशभरातील प्रादेशिक वाहिन्यांना बळकटी देण्यासाठी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे चित्रपट, नव्या विषयाच्या व धाटणीच्या वेब मालिका, आणि मनाला भिडणाऱ्या अप्रतिम कथा यांचा समावेश करत प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट आणणार असल्याचे जाहीर केले होते. भारतातील प्रत्येक भाषा, संस्कृती यांची गोष्ट मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस असल्याचे जिओ स्टडिओजच्या वतीने सांगण्यात आले होते. जिओची प्रस्तुती असलेल्या या नव्या उपक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले आणि पुरस्कारप्राप्त चित्रपटही या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित केले जाणार आहेत. यात ‘बाईपण भारी देवा’, ‘गोदावरी’, ‘मी वसंतराव’ या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच, ‘फोर ब्लाइंड मेन’, ‘वनटूथ्रीफोर’, ‘खरवस’, ‘काटा किर्र्र’, ‘खाशाबा’ या नव्या कोऱ्या मराठी चित्रपटांची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. याशिवाय ‘कालसूत्र’, ‘एका कलेचे मणी’, ‘अगं आई अहो आई’ या मराठीतील नव्या वेब मालिकांचाही समावेश आहे.

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
article about veteran film critic and author aruna vasudev
व्यक्तिवेध : अरुणा वासुदेव
Rajinikanth, Rajinikanth will star in coolie movie, Nagarjuna Akkineni, nagarjuna, Sathyaraj, Shruti Haasan, Coolie movie,
सुपरस्टार रजनीकांत, नागार्जुन अन् ‘बाहुबली’ फेम सत्यराज; ‘या’ चित्रपटात दाक्षिणात्य दिग्गजांची मांदियाळी, पोस्टर प्रदर्शित
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
old movies, mumbai, movies re-released,
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन; नवीन चित्रपट नसल्याने चार जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित
old bollywood gang of vasepur and marathi tumbad movie rerealse in theatre
‘या’ सुपरहिट मराठी चित्रपटासह गाजलेले हिंदी सिनेमे पुन्हा थिएटर्समध्ये होणार प्रदर्शित, वाचा यादी
rehnaa hai terre dil mein releases again in the theatres
पहिल्या नजरेत प्रेम, हिरोने लपवली ओळख अन्…; २३ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ रोमँटिक चित्रपट! आजही प्रत्येक गाणं आहे सुपरहिट