सिने आणि नाट्यविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री अरूंधती नाग ‘मीडियम स्पाइसी’ ह्या सिनेमाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत परतणार आहेत. पद्मश्री अरूंधती नाग ह्यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी ‘२२ जून १८९७’ ह्या मराठी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर आता विधी कासलीवाल निर्मित, मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखीत, ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमातून त्या मराठीत परत दिसणार आहेत

अरूंधती नाग यांच्या भूमिकेविषयी सांगताना दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणाले, “चित्रपटाचे कथानक आकारत असताना, ‘लक्ष्मी टिपणीस’ह्या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यांसमोर फक्त अरूंधती नाग यांचीच प्रतिमा उभी राहिली. लक्ष्मी टिपणीस अतिशय प्रगल्भ आणि पुरोगामी स्त्री आहे. पण त्यासोबतच ती जेवढी बुद्धिमान आहे, तेवढीच तिच्यात मायेची उब आहे. सिनेमात जेव्हा लक्ष्मीची एन्ट्री होते, तेव्हा तिला पाहताच तिच्या चैतन्यमयी व्यक्तिमत्वाची जाणीव व्हावी, असं मला वाटलं. म्हणूनच अरूंधती ह्यांना ही भूमिका ऑफर केली.”

nagma actress link up with three married celebrities
तीन विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडली होती ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री; बॉलीवूडसह दक्षिणेत केलेत अनेक सुपरहिट सिनेमे
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mrunal Dusanis New Business
Video : अमेरिकेहून भारतात आलेल्या मृणाल दुसानिसचं व्यवसाय क्षेत्रात पदार्पण! नवा बिझनेस आहे तरी काय? दाखवली झलक
Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem
लग्नानंतर होईलच प्रेम : नव्या मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट माहितीये का? मृणाल दुसानिस अन् ज्ञानदाच्या भूमिकेविषयी जाणून घ्या…
bhagare guruji son Akhilesh bhagare will get marriage anagha atul share video
भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लेकीने लग्नघराचा व्हिडीओ केला शेअर
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Jheel Mehta Marriage on 28 december
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; ‘या’ दिवशी वाजणार सनई-चौघडे
Aasiya Kazi Gulshan Nain Wedding date
८ वर्षांचं प्रेम, कुटुंबियांचा विरोध अन्…; ‘ही’ लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री ‘या’ दिवशी करणार आंतरधर्मीय लग्न

मोहित पुढे म्हणाले, “मी अरूंधती नाग यांना गेली १५-२० वर्ष ओळखतो. त्या जेवढ्या बहुआयामी आणि प्रतिभावान कलाकार आहेत, तेवढ्याच नम्रही आहेत. आपल्या भूमिकेच्या लांबीपेक्षा कलाकृतीत समरसून व्यक्तिरेखेशी एकनिष्ठ राहण्याकडे त्यांचा कल असतो. त्या जरी मराठीत ४० वर्षांनी परतत असल्या तरीही, त्यांचे मराठीवर प्रभुत्व आहे आणि मुख्य म्हणजे सिनेमाच्या भाषेवर त्यांचे प्रेम आहे.”

मराठीतल्या आपल्या पुनरागमनाबाबत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री अरूंधती नागही खूप उत्सुक आहेत. त्या मराठी सिनेसृष्टीत परण्याविषयी म्हणाल्या, “४० वर्षांनंतर मराठी सिनेसृष्टीत परतणं, ही निश्चितच आल्हाददायक गोष्ट आहे. परतताना एखाद्या नवोदितासारखी अनुभूती होतेय. बंगलोरला आमच्या रंगशंकरा नाट्यमंदिरात मोहित त्याच्या नाटकांचे प्रयोग करायला येत असतो. अशाच एका प्रयोगावेळी मोहित मला त्याच्यासोबत बसायची विनंती करत म्हणाला, अरू अक्का, मी लवकरच एक चित्रपट दिग्दर्शित करतोय. त्यामध्ये तू एक भूमिका करावीस, अशी माझी इच्छा आहे.”

मोहितसोबतच ललित प्रभाकरचीही त्यांनी प्रशंसा केली. त्या म्हणाल्या, “ चित्रपटाचे कथानक आणि व्यक्तिरेखेविषयीची माहिती मला पाठवण्यात आली होती. पण सेटवर पोहोचल्यावर ती भूमिका जिवंत करताना खरी गंमत आली. ललित प्रभाकरसोबत संहितेचे वाचन केले. ललित त्याच्या भूमिकेत चांगलाच उतरला होता. एका प्रतिभावान दिग्दर्शकासोबत काम करायला आणि एक अद्भूत सशक्त महिलेला साकारायला मिळाल्यावर अभिनेत्री म्हणून काही विशेष अवघड करावं लागलं नाही.”

‘मीडियम स्पाइसी’ नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. ह्या चित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, ह्या युवाकलाकारांसोबतच नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी हे ज्येष्ठ कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमधून दिसतील. हा सिनेमा ५ जून २०२०ला रिलीज होणार आहे.