सौंदर्य आणि अभिनयाचा योग्य मिलाफ असलेली अभिनेत्री परदेशातून भारतात आली असून ती आपल्या जुन्या सहकलाकाराला भेटण्यास त्याच्या घरी पोहचली. मात्र, तिच्या सहकलाकाराला तिची ओळख लगेचं पटलीच नाही. तुम्हाला तरी कळले का कोण आहे ही अभिनेत्री? अनेक पुरस्कारांवर नाव नोंदवणा-या दामिनी चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केले होते. हो आम्ही बोलतोय ते मिनाक्षी शेषाद्री आणि ऋषी कपूर यांच्याबद्दल.


लग्नानंतर परदेशात राहत असलेली मिनाक्षी नुकतीच भारतात आली आहे. यावेळी ती काहीही कल्पना न देता ऋषी कपूर यांच्या भेटीला गेली. मात्र, इतक्या वर्षांनंतर आपल्या जुन्या मैत्रिणीला ओळखण्यास ऋषी असफल राहिले. तसे, त्यांनी ट्विटवर पोस्टही केले.
‘दामिनी’, ‘घायल’, ‘हिरो’, ‘शहेनशाह’, ‘घातक’ अशा अनेक चित्रपटात काम केलेल्या मिनाक्षीने हरिश मैसूरशी विवाह केल्यानंतर चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता. मुलगी केंद्रा आणि मुलगा जोश, या दोन मुलांची आई असलेली मिनाक्षी अमेरिकेतील टेक्सासमधील प्लॅनो येथे राहते. आजही मिनाक्षी तितकीच सुंदर आणि रेखीव दिसते.

Story img Loader