बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानच्या तमाम चाहत्यांना त्याच्यासोबत फेसबुकवर ‘लाईव्ह चॅट’ करण्याची संधी मिळणार आहे. आज (बुधवार) रात्री शाहरूख आपल्या चाहत्यांबरोबर ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या त्याच्या ‘सुपर हिट’ चित्रपटाविषयी संवाद साधणार आहे. रात्री ९ वाजता शाहरूख आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा दिग्दर्शक रोहित शेट्टी चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी फेसबुकवर ‘लाईव्ह’ येणार आहेत. पहिल्यांदाच असे होत आहे की, एक अभिनेता त्याच्या फेसबुक पेजवरून भारतातील आणि जगभरातील त्याच्या चाहत्यांशी संवाद साधणार आहे, असे या सोशल नेटवर्किंग साईटद्वारे सांगण्यात आले. शाहरूखच्या https://www.facebook.com/IamSRK या फेसबुक पेजवर तुम्ही त्याच्याशी ‘लाईव्ह चॅट’ करू शकता.

Story img Loader