लग्न म्हटलं की पाहुण्यांच्या यादीपासून ते अगदी लग्नात कोणते कपडे घालायचे इथपर्यंत प्रत्येक गोष्टीबद्दलचा उत्साह ओसंडून वाहात असतो. त्यातही ‘डेस्टिनेशन वेडिंग’ म्हणजे अनेकांसाठी मोठं कुतूहल. असाच एक बहुचर्चित ‘डेस्टिनेशन वेडिंग’ सोहळा नुकताच इटलीमध्ये पार पडला. तो सोहळा म्हणजे विराट आणि अनुष्का शर्माच्या लग्नाचा. टस्कनीमध्ये मोठ्या थाटामाटत त्यांचा लग्नसोहळा पार पडला. पण, त्यामध्ये कुठेच भडकपणा पाहायला मिळाला नाही. विराट, अनुष्काच्या या स्वप्नवत ‘डेस्टिनेशन वेडिंग’ची जबाबदारी लिलया पेलली होती, लखनऊच्या देविका नारायणने.
हाय प्रोफाइल डेस्टिनेशन वेडिंग प्लॅनर्सच्या यादीत लोकप्रिय असलेल्या देविकाने अनुष्का विराटच्या लग्नसोहळ्यात छायाचित्रकारांपासून इतर सर्व व्यवस्था सांभाळली होती. मुळची लखनऊची असणारी देविका ‘लॉरेटो कॉन्व्हेंट’ शाळेत शिकली असून त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तिने दिल्ली गाठली. तिथे प्रतिष्ठित लेडी श्रीराम महाविद्यालयात तिने प्रवेश मिळवला. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिने स्वत:ची कंपनी सुरू केली.
वाचा : अबब! विरुष्काचे लग्न झालेल्या रिसॉर्टचे भाडे जाणून तुम्हीही व्हाल अवाक्
https://www.instagram.com/p/BckT9cgl-5Z/
विराट-अनुष्काच्या लग्नाचे काम मिळणे ही एक मोठी जबाबदारी होती. देविकाने तिच्या पतीच्या साथीने अतिशय सुंदररित्या हे काम पार पाडले. विरुष्काच्या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर देविकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट करत या खास क्षणांमध्ये आपल्याला सहभागी करुन घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. साहजिकच या यशानंतर ‘वेडिंग प्लॅनर’ म्हणून देविकाची ख्याती आणखी वाढली आहे.