मराठी चित्रपटाची केवढी तरी निर्मिती वाढत्येय, मराठीत केवढ्या तरी तारका आहेत हे हल्ली सांगावे लागत नाही. पण मीता सावरकर मात्र एकाही मराठी चित्रपटातून का बरे दिसत नाही? ‘भारतीय’ला एक वर्ष झाले, पण मीताकडे एकही मराठी चित्रपट का नाही? यावर ती सांगते, अहो मला घाई कुठे आहे? आणि मराठी चित्रपटाची संख्या वढवण्यात मला तर फारसा रस नाही. अधूनमधून मला मराठी चित्रपटाच्या संदर्भात विचारणा केली जाते, पण त्यात आव्हानात्मक असे काही नसते. उगाचचं आपले ‘शोभेची बाहुली’ म्हणून काम करण्यात काय अर्थ आहे? शिवय मराठीत हा गट, तो गट असा प्रकार आहे. मी तूर्त तरी कोणत्याच गटात नाही. माझे मॉडेलिंगमध्ये अगदी उत्तम सुरु आहे. मध्यंतरी तेथेही काम थोडे कमी होते पण संयम पाळला आणि चांगली संधी मिळाली. तसेच मराठी चित्रपटाबाबतही होईल. अगदी नक्की होईल असा मला पूर्ण विश्वास आहे असे मीता सावरकर अगदी मनापासून सांगते. तिच्या प्रचंड आशावादाला आपण भरपूर सदिच्छा देवू शकतो.

Story img Loader