‘मेगा ब्लॉकबस्टर’ची चाहते पहिल्या दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे. क्रिकेटर रोहित शर्मा यातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वीच यातील मुख्य कलाकारांचा फर्स्ट लूक आऊट करण्यात आला होता. या कलाकारांचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या ‘मेगा ब्लॉकबस्टर’बद्दल उत्सुकता वाढली. अखेर ‘मेगा ब्लॉकबस्टर’मागील सिक्रेट उघड झाले आहे. हा कोणताही चित्रपट नसून ‘मीशो’ अॅपची जाहिरात आहे.

आणखी वाचा : “घरांबरोबर स्वप्नंही धुळीला मिळाली…” नोएडाच्या ट्विन टॉवर्समध्ये घरं असलेल्या अभिनेत्याने व्यक्त केले दुःख

याआधी हा एक चित्रपट असल्याचे बोलले जात होते. कारण त्याचे एका चित्रपटाप्रमाणे प्रमोशन करण्यात येत होते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रश्मिका मंदाना, कॉमेडीयन कपिल शर्मा आणि या रोहित शर्मा यांचे लूक्स रिलीज करण्यात आले. त्यापाठोपाठ या ‘मेगा ब्लॉकबस्टर’मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचीही एंट्री झाली.

दीपिकाने सोशल मीडियावरून ही बातमी दिली. तिने या एक पोस्टर शेअर करत यातील तिचा लूक सोशल मीडियावर शेअर केला. हे पोस्टर शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये ‘सरप्राईज’ असे लिहिले. दीपिकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरपूर कमेंट्स केल्या. त्यात प्रेक्षक दीपिकाला नव्या भूमिकेत बघण्यासाठी उत्सुक झाले असल्याचे कमेंट्स करून सांगत होते. तसेच ‘मेगा ब्लॉकबस्टर’बद्दल अधिक माहिती विचारत होते. त्याची सर्वत्र चर्चा होती. पण आता नुकताच याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ‘मेगा ब्लॉकबस्टर’चा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. या जाहिरातीत ‘मेगा ब्लॉकबस्टर’बद्दल पोस्ट टाकणारे सर्व कलाकार दिसत आहेत. रणवीर सिंग, सौरव गांगुली यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

पहा व्हिडीओ –

हेही वाचा : ‘मेगा ब्लॉकबस्टर’ चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक प्रदर्शित, रोहित शर्माने वेधले लक्ष

काही दिवसांपूर्वी ‘मेगा ब्लॉकबस्टर’च्या या सिक्रेटवर क्रिकेटर सौरव गांगुलीच्या सोशल मीडिया टीमने केलेल्या एका पोस्टमुळे पाणी फिरले आणि हा चित्रपट नसून एका ब्रँडची जाहिरात असल्याचे समोर आले होते. क्रिकेटर सौरव गांगुलीने एक पोस्ट करत ‘मेगा ब्लॉकबस्टर’चे सिक्रेट उघड केले. सोशल मीडियावर सौरव गांगुलीच्या अकाउंटवरून केली गेलेली एक पोस्ट व्हायरल झाली. सौरव गांगुलीला कंपनीने पाठवलेला मजकुर त्याच्या सोशल मीडिया टीमने जसाच्या तसा कॉपी करून त्याच्या पोस्टमध्ये टाकला होता. त्यात ठळक अक्षरांत लिहिले होते की, ‘मीशो ब्रँडचे नाव आणि हॅशटॅग पोस्टमध्ये अजिबात यायला नको.’ याद्वारे उघड झाले होते की ‘मेगा ब्लॉकबस्टर’ हा चित्रपट किंवा वेब सिरीज नसून एका अॅपचा प्रमोशनल व्हिडिओ आहे. आपली चुक लक्षात आल्यावर सौरव गांगुलीच्या अकाउंटवरून ही पोस्ट डिलीट करण्यात आली होती. परंतु डिलीट व्हायच्या आत ती पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि तेव्हाच हा चित्रपट नसून एक जाहिरात आहे हे उघड झाले होते.

Story img Loader