चित्रपटप्रेमी सध्या दाक्षिणात्य चित्रपटांवर भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. ‘पुष्पा’, ‘RRR’, ‘KGF’, ‘विक्रम’ अशा चित्रपटांनी बॉलिवूडचं धाबं दणाणून सोडलं असल्याची चर्चा सतत सोशल मीडियावर होत असते. सध्या लोकं बॉलिवूडवर प्रचंड नाराज असल्याने दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतली ही दरी वाढत चालली असल्याचं काही तज्ञांचं म्हणणं आहे. पण आता ही दरी येत्या दसऱ्याला भरून निघणार आहे. दक्षिणेतला एक मोठा सुपरस्टार आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मोठा सुपरस्टार एकाच चित्रपटात दिसणार आहेत.

मेगास्टार चिरंजीवी आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हे दोघे एका बिग बजेट चित्रपटात एकत्र झळकणार आहे. चित्रपटाचं नाव आहे ‘गॉडफादर’. येत्या ५ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच चित्रपटाच्या निर्मात्यांनी याचा एक टीझर प्रदर्शित केला आहे. हा टीजर पाहून सगळ्यांनाच या सिनेमाबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. टीझरमध्ये नेहमीप्रमाणेच चिरंजीवी हे त्यांच्या डॅशिंग अवतारात दिसत आहेत. याबरोबरच अभिनेत्री नयनतारादेखील यामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरच्या शेवटी सलमान खानची एक छोटीशी झलक बघायला मिळत आहे. यातही सलमान खान जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

टीझरवरून तरी हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल असाच वाटत आहे. शिवाय देशातले एवढे मोठे सुपरस्टार एकत्र दिसणार असल्याकारणाने त्यांचे चाहतेदेखील यासाठी खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट मोहनलाल यांच्या मल्याळम ‘लुसिफर’ या चित्रपटाचा रिमेक आहे. मुळ सिनेमातली पृथ्वीराज सुकुमारनची भूमिका सलमान खान साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहन राजा करणार आहेत. शिवाय सलमान खान प्रथमच एका तेलुगू चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

आणखीन वाचा : ‘पुष्पा २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रीकरणाचा मुहूर्तही ठरला

चिरंजीवी आणि सलमान हे दोन सुपरस्टार प्रेक्षकांना सिनेगरूहाकडे वळवण्यात यशस्वी होणार का? हे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सध्या तरी या टीजरमुळे बॉलिवूडप्रेमी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांचे चाहते प्रचंड खुश आहेत. सोशल मीडियावर सगळेच या चित्रपटाचं स्वागत करत आहेत. सलमानचे ‘टायगर ३’ आणि ‘भाईजान’ हे दोन्ही चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.

Story img Loader