दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता तेजा सज्जाचा ‘हनुमान’ (HanuMan) चित्रपट १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शनापूर्वीचा (प्री-रिलीज) एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीने हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात चिरंजीवीने राम मंदिरासंदर्भातली मोठी घोषणा केली.

या कार्यक्रमात चिरंजीवीने ‘हनुमान’ चित्रपटाच्या टीमने घेतलेल्या कौतुकास्पद निर्णयाची घोषणा केली. या चित्रपटाच्या तिकिटातील पैशातून राम मंदिरासाठी दान केलं जाणार आहे, असं अभिनेत्याने जाहीर केलं. तेव्हापासून ‘हनुमान’ चित्रपटाच्या टीमचं चहूबाजूने कौतुक केलं जात आहे.

Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा

हेही वाचा – Video: “काही कळायच्या आत राज ठाकरे गाडीतून उतरले अन्…”, सिद्धार्थ जाधवने सांगितला खालापूर टोलनाक्यावरील अनुभव

चिरंजीवी कार्यक्रमात ही घोषणा करताना म्हणाला की, अयोध्येतील राम मंदिराची उभारणी हा इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. मला २२ तारखेला राम मंदिर उद्घाटनासाठी आमंत्रण दिलं असून मी माझ्या कुटुंबांसह उपस्थित राहणार आहे. राम मंदिर उद्घाटनाचं औचित्य साधून ‘हनुमान’ चित्रपटाच्या टीमने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या विक्री झालेल्या प्रत्येक तिकिटातून ५ रुपये राम मंदिरासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासाठी ‘हनुमान’ टीमला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.

हेही वाचा – “डोळे पाणावले…”, केदार शिंदेंसंबंधित ‘तो’ क्षण पाहून भारावल्या पत्नी बेला शिंदे, म्हणाल्या, “२७ वर्षे…”

‘हनुमान’ चित्रपटात तेजा सज्जा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर विनय राय खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. तसेच अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार, राज दीपक शेट्टी हे देखील ‘हनुमान’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १२ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि लेखनाची धुरा प्रशांत वर्मा यांनी सांभाळली आहे.

Story img Loader