सध्या सर्वत्र गौतमी पाटील हे नाव चर्चेत आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना, लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्यावरुन ती चर्चेत आली आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरुन अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. बिग बॉस फेम लावणी कलाकार अभिनेत्री मेघा घाडगे यांनी फेसबुक पोस्टद्वारे गौतमीची चांगलीच कानउघाडणी केली होती. मेघाच्या या पोस्टवर अनेकांनी तिला समर्थन दिले आहे. काळजी नका करू आम्ही कायम फक्त खऱ्या कलाकारांच्या सोबत आहोत, अशा कमेंट तिच्या या पोस्टवर पाहायला मिळत होत्या.

मेघा घाडगेने मीही या पुढे साडीचा पदर अंगावर घेणार नाही. पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी, परकर वर करेन आणि पाण्याची बाटली घेऊन अंगावर ओली चिंब होईपर्यंत ओतेन, अशा उपहासात्मक शब्दात गौतमी पाटीलवर टीका केली होती. मेघा घाडगेच्या फेसबुक पोस्टवर पार्थ पाटील नावाच्या एका व्यक्तीने कमेंट केली आहे. ती व्यक्ती गौतमी पाटीलशी संबंधित असल्याचा आरोप मेघा घाडगेने तिच्या फेसबुक लाईव्हमध्ये केला आहे. पार्थ पाटीलच्या कमेंटवर मेघानेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
CCI probe finds Zomato, Swiggy violating competition norms
स्पर्धा आयोगाकडून चौकशीवर अंतिम निवाडा आला नसल्याचा दावा
Supriya Sule criticizes Mahayuti over Uddhav Thackeray bag checking case Pune news
उद्धव ठाकरे यांच्या बॅग चेक प्रकरणावर सुप्रिया सुळे यांच मोठ विधान…..
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!

पार्थ पाटीलची कमेंट

“गौतमी पाटील हि गौतमी पाटील आहे समाज्याने तिला स्वीकारलं आहे. तिच्यामुळे तुमच्या सुपाऱ्या बंद झाल्या हे तुझं दुखणं आहे… बाकी नाही ! बिग बॉसमध्ये चेक मिळवण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ कलावंत घाडगे ताई ! इथे लिहून रोड वर येऊन गौतमीला मिळणाऱ्या सुपाऱ्या बंद नाही होऊ शकत … सत्य आणि वास्तव आहे”, अशी कमेंट पार्थ पाटील नावाच्या व्यक्तीने केली आहे. त्यावर मेघा घाडगेनेही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

मेघा घाडगेचे प्रत्युत्तर

“प्रार्थ पाटील… मस्त पार्थ दादा…! समाजाने आम्हाला नाही स्वीकारलं, कारण आम्ही शिवकालीन संस्कृती जपली आणि पारंपरिक लोककला पुढल्या पिढीला देण्याचा प्रयत्न केला. खूप मूर्ख आहेत लोक. बिग बॉस एक शो आहे तिथेही मी पैसे मिळतील म्हणून गेले . सॉरी मी अगदीच कपडे पूर्ण घातले आणि बाप काढला आणि शिवीगाळ केली म्हणून भांडले तर तस नाही करायला हवं होत. उपाशी राहून कुटुंबासाठी नाही जायला हवं होत. पण खऱ्या अर्थाने तिने आमचे डोळे उघडले.

आमच्या सुपाऱ्या बंद केल्या पारंपरिक लावणी पाहायला येणारा प्रेक्षक पळून लावला. काही दिवसांतच थोडे फार का होईनात येत होता. आत्ता त्यांना गौतमी सारखी लावणी आणि खरी अश्लील आदकरा मिळाली. आत्ता नक्कीच चांगले दिवस येतील. दादा माझे घुंगरू आणि शालू विकायला काढलेत प्लीझ घ्याल का?? आणि गौतमीला गुरु मानलंय तुमच्या डोळ्या देखत शिष्य म्हणून स्वीकार करेल का मला. भाऊ म्हणून येवढ करा माझ्यासाठी..! म्हणजे अश्या बिगबॉस सारख्या कार्यक्रमात चेक घ्यायला जाणार नाही मी”, अशी कमेंट करत मेघाने त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

दरम्यान मेघा घाडगेच्या त्या प्रत्युत्तरावर अनेकांनी तिला समर्थन केले आहे. तसेच यावरुन पार्थ पाटील ट्रोल होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. “मॅडम गौतमी वरून तुम्हाला ट्रोल करणारे त्यांच्या घरातल्या मुलींना असं अश्लिल हावभाव करून नाचायला लावतील का ? तशा सुपाऱ्या त्यांना मिळवून देतील का ? असे विचारा त्यांना”, असा प्रश्न एका नेटकऱ्याने उपस्थित केला आहे.

parth patil
पार्थ पाटील ट्रोल

“इथं विषय सुपारीचा नाही इज्जतीचा आहे.. म्हणून मेघा ताई बोलली”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर अनेकांनी तो राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया उपाध्यक्ष असल्याचे म्हटलं आहे.