लावणी नृत्याचा तडका हे  मराठी चित्रपटाच्या मनोरंजनाचे एक वैशिष्ट्य. लावणी निपुण तारकेला त्यावर नृत्याची संधी मिळाल्यावर तर ती साकारण्यातील जोश वाढणारच. मेघा घाडगेच्या बाबतीत तसे झाले आहे. सतिश राजवाडे दिग्दर्शित ‘पोपट’ या चित्रपटात तिला लावणी साकारायची संधी मिळाली आहे. याबाबत मेघा घाडगे सांगत होती, या चित्रपटात चित्रपट बनवता बनवता तीन युवकांचा कसा ‘पोपट’ होतो या भोवतीचे कथानक असून त्यात ‘जरा दाबा की बटण मोबाईलचे’ या लावणीवर मला नृत्याची मिळालेली संधी मी खूप एन्जॉय केली. २००४ च्या ‘पछाडलेला’ पासूनचा ‘पोपट’ हा माझा पंचवीसावा चित्रपट आहे. वाढत्या स्पर्धेची जाणीव मला आहे, पण ‘एकापेक्षा एक’ हा नृत्याचा रियालिटी शो आणि रंगमंच या जोडीने माझी सुखद वाटचाल सुरू आहे, असेही मेघा घाडगे हिने सांगितले.

Story img Loader