बॉयकॉट बॉलीवूड ट्रेंड हा गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. आमिर खानच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ पासून सुरू झालेल्या या ट्रेंड मध्ये बॉलिवूडचे अनेक चित्रपट भरडले गेले. अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ चित्रपटलाही याचा मोठा फटका बसला होता. त्यापाठोपाठ सोशल मीडियावर आता ‘ब्रम्हास्त्र’ला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. त्यावर आता शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया देत बॉयकॉट ट्रेंडला विरोध दर्शवला आहे.
आणखी वाचा : “दत्तक, सरोगसी आणि आयव्हीएफसारख्या पद्धती…” विद्युत जामवालच्या वक्तव्याने वेधले लक्ष
ब्रम्हास्त्रचे दिग्दर्शक अयान मुखर्जी, या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना मंदिरात जाण्यास मज्जाव केला होता. यासगळ्याचे सोशल मीडियावर जोरदार पडसाद उमटल्याचे दिसत आहेत. घडल्या प्रकारची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या घटनेचा शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी निषेध केला असून सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो ट्वीट करुन आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी आलिया – रणबीरची बाजू घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आलिया – रणबीरचा एक जुना फोटो त्यांनी ट्विट केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले, “हा फोटो तुमची काहीही मदत करणार नाही. तो शांत राहिल. उज्जैनच्या मंदिरात आलिया – रणबीरला प्रवेश न देणे ही लज्जास्पद गोष्ट आहे. राजकारण किती खालच्या थराला जाते आहे हे त्यावरुन दिसून येत आहे. आता तर कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वाद होणं हा एक ट्रेंडच झाला आहे. लॉबिंग करुन चित्रपटांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले आहे.”
हेही वाचा : प्रदर्शनाच्या आधीच ‘ब्रम्हास्त्र’ने कमावले ‘इतके’ कोटी, नवा विक्रम रचण्यासाठी चित्रपट सज्ज
‘ब्रह्मास्त्र’ भारतात जवळपास ५ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासह बिग बी अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय यांच्या देखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार पद्धतीने सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता नागार्जुनही जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे.