‘ब्रह्मास्र’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. इतर बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच ‘ब्रह्मास्र’लाही बॉयकॉट ट्रेण्डचा सामना करावा लागला होता. परंतु, बॉक्स ऑफिसवर ‘ब्रह्मास्र’ची जादू कायम आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. ‘बॉयकॉट ब्रम्हास्त्र’ हा ट्रेंड अजूनही सोशल मीडियावर सुरु आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरातून ३०० कोटींची विक्रमी कमाई केली आहे. असे सगळे असूनही सोशल मीडियावर या चित्रपटावर अनेक मीम्स बनत असून ते तुफान व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘बाजीगर’ चित्रपटात शाहरुख खानच्या जागी दिसला असता ‘हा’ अभिनेता, पण…

या चित्रपटाबाबत प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींना हा चित्रपट खूप आवडला, काहींना चित्रपटातील विशिष्ट गोष्ट आवडली तर काहींनी या चित्रपटाला नावं ठेवली. सोशल मीडियावर या चित्रपटावर नेटकऱ्यांनी अनेक मीम्स तयार केले असून अजूनही नेटकरी त्या मीम्सचा आनंद घेताना दिसत आहेत.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात आलिया भट्टच्या अभिनयावरून मीम्समध्ये तिची खिल्ली उडविण्यात आली आहे. या चित्रपटात तिला ‘शिवा’ हा एकच शब्द डायलॉग म्हणून दिला होता असे अनेकांनी म्हटले आहे.

तर काहींनी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया मीम्सच्या माध्यमातून मांडल्या आहेत. ज्यात या चित्रपटाचे फक्त व्हीएफएक्स चांगले आहेत असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

तसेच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने २५० हून अधिक कोटींची कमाई रिकाम्या चित्रपटगृहांमधून केली आहे, असे मत काहींनी व्यक्त केलं आहे.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात व्हीएफएक्सवर उगाचच इतके पैसे खर्च केले गेले आहेत, तेच काम १५० रुपयातही होऊ शकतं हे नेटकऱ्यांनी दाखवून दिलं आहे.

आणखी वाचा : ‘ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर रणबीर कपूर नव्या भूमिकेसाठी सज्ज, ‘या’ अभिनेत्रीबरोबर पहिल्यांदाच झळकणार

आतापर्यंत या चित्रपटाने ७ मोठे रेकॉर्ड्स मोडले आहेत. अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटाने यावर्षी सर्वात जास्त अॅडव्हान्स बुकिंग झालेल्या ‘भुलभुलैय्या २’ ला मागे टाकले आहे.परदेशातूनही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशांमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ची क्रेझ दिसून येत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट जगभरात ९००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Memes about brahmastra film got viral on social media rnv