बॉलिवूड तारका सोनम कपूर म्हणते माझ्या घरातील पुरूषांचा लग्न नावाच्या गोष्टीवर विश्वास नाही. सोनमचे वडिल अभिनेते अनिल कपूर देखील लग्न संस्थेवर विश्वास ठेवत नसून, त्यांचा लग्न या गोष्टीला प्रचंड विरोध असल्याचे सोनम सांगते.
“माझ्या वडिलांचा लग्न नावाच्या बुरसट कल्पनेवर अजिबात विश्वास नाही. त्यांच्यामते लग्न ही खूपच जुनी कल्पना आहे. माझ्या कुटुंबातील इतर पुरूष देखील लग्नाच्या विरोधात आहेत. त्यामुळे ज्या कुणाला माझ्याशी लग्न करायचे आहे, त्याला आधी माझे वडिल आणि सहा भावांचा सामना करावा लागणार आहे”, असे सोनम पत्रकारांना म्हणाली.
अनिल कपूरची लहान मुलगी रिया तिचा बॉयफ्रेड करण बुलानीशी लग्न करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आल्यावर सोनमने अशी प्रतिक्रिया दिल्याचे म्हटले जात आहे.
लहान बहिणीच्या लग्नाच्या बातमीचे खंडन करत सोनमने ‘ती एक अफवा आहे’ असे म्हटले आहे. रिया अद्याप खूप लहान असून, ती इतक्यात लग्न करणार नसल्याचे सोनम म्हणाली.
“येत्या महिनाभरात रिया तिच्या नव्या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात करत असून, त्या चित्रपटाचे दिग्दर्शक करण बुलानी करणार आहे. त्यामुळे लोक चित्रपट बनवणे व लग्न करणे या गोंधळामध्ये आहेत असे मला वाटते. सुदैवाने माझी बहिण लग्न करत नाही, कारण मला ती घरात असल्याचे आवडते”, असे सोनम म्हणाली. सोनमच्या सांगण्यानुसार रिया साधारण ५-६ वर्षे तरी लग्नाचा कोणताही विचार करणार नाही.
सोनम स्वत: देखील इंडस्ट्रीमधील कुणासोबत डेटींगवर जात नसल्याचे सांगायला विसरली नाही. “मला काम आणि मौज या दोन्ही गोष्टींची गफलत करायला आवडत नाही”, असे सोनम म्हणते.
सोनम व पुनित मल्होत्रा डेटींगवर जात असल्याच्या अफवेने बॉलिवूड वर्तूळामध्ये जोर धरला होता.
सोनमच्या घरच्यांना लग्नाचे वावडे..
बॉलिवूड तारका सोनम कपूर म्हणते माझ्या घरातील पुरूषांचा लग्न नावाच्या गोष्टीवर विश्वास नाही. सोनमचे वडिल अभिनेते अनिल कपूर देखील..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-07-2013 at 02:14 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Men in my family are completely against marriage sonam kapoor