महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले, शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेन्स चित्रपटांपेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर सत्तानाट्यावर आधारित ‘मी पुन्हा येईन’ नावाची वेबसीरिज येणार आहे. पण या वेबसीरिजचं शूटिंग हे काही दिवसांपूर्वी नाही तर गेल्या वर्षी झालं होतं. याचा खुलासा हा वेबसीरिजचे दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हे सांगितलं आहे.
आणखी वाचा : व्हिडीओ मलायकाचा, पण मागच्या काकांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा व्हिडीओ
अरविंद जगताप यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मी पुन्हा येईन या वेबसीरिजचा टीझर शेअर केला आहे. यावेळी हा टीझर शेअर करत “मी पुन्हा येईन. मागच्या वर्षी जुलैमध्ये मी पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून केलेली ही सीरिज. याचा वास्तवाशी संबंध नाही. कारण लेखक दिग्दर्शक म्हणून आपण वास्तवातल्या राजकारणाच्या पातळीवर पोहोचणं अशक्य आहे. हे एका सामान्य माणसाच्या नजरेतून पाहिलेलं राजकारण. राजकारणात काही खरं नाही हेच खरं आहे, हे हसत खेळत सांगणारी मी पुन्हा येईन. याच महिन्यात प्लॅनेट मराठीवर”, असे कॅप्शन त्यांनी दिले.
आणखी वाचा : ‘कॉफी विथ करण’चा एका एपिसोडसाठी करण जोहर घेतो इतके कोटी, रक्कम ऐकून व्हाल थक्क
पाहा पोस्ट
आणखी वाचा : “सेलिब्रिटींनी प्रक्षोभक विधाने केली नाहीत तर…”, देशातील वाढत्या तणावावर मकरंद देशपांडेंचा सल्ला
‘मी पुन्हा येईन’ ही सीरिज या महिन्यात प्रदर्शित होणार असून टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची आठवण झाली. आमदार नाराज, मग ते नॉट रिचेबल होणं, रिसॉर्ट पॉलिटिक्स अशा अनेक घटना या टीझरमध्ये पाहायला मिळाल्या. अर्थात महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी हे सगळं प्रकरण आधीच पाहिलय अशा प्रतिक्रिया त्या टीझरवर दिल्या. पण या वेबसीरिजचे दिग्दर्शन हे काही दिवसांपूर्वी नाही तर गेल्या वर्षी करण्यातं आलं आहे.
आणखी वाचा : Leg Exercise नंतर अशी होते अवस्था, रितेशने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
अरविंद जगताप यांचे लिखाण आणि दिग्दर्शन असलेल्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे. या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.