बॉलिवूडमधील सध्याचा यशस्वी नृत्यदिग्दर्शक रेमोने त्याच्या यशाचे श्रेय किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनला देतो. कारण, त्याच्यामुळेच नृत्य करण्याची प्रेरणा त्याला मिळाली होती. मूळचा गुजरातच्या जामनगरमधील रेमो त्याच्या यशासाठी आईचे व बहिणीचेही आभार मानतो. १९९५ साली प्रदर्शित झालेल्या रंगीला चित्रपटाने रेमोने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
रेमो म्हणाला की, जेव्हा पहिल्यांदा मायकल जॅक्सनला नृत्य करताना पाहिले तेव्हा मी १४ वर्षांचा होतो. मायकल कसे नृत्य करतात? यावर मी विचार करायचो. तेव्हा मी त्यांचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. त्याकाळी आमच्याकडे टेलिव्हिजन नव्हता आणि व्हिसीआरवर व्हिडीओ पाहणेही शक्य नव्हते. तसेच, गुजरातमध्ये कोण मायकल जॅक्सनच्या टेप ठेवणार? पण,मला एकावर्षानंतर अशी व्यक्ती सापडली जी मला मुंबईवरून त्या टेप आणून देऊ शकत होती. याप्रकारे मी माझा नृत्याचा प्रवास सुरु केला आणि आई-वडिलांना आपल्याला शिकण्याची इच्छा नसून नृत्य करायचे आहे असे सांगितले. सुरुवातीला सगळे घाबरले. वडिल माझ्याविरुद्ध होते. पण, आईने आणि बहिणीने माझी साथ दिली आणि मला एका महिन्यासाठी मुंबईला जाण्याची परवानगी मिळाली. सुरुवातीला मुंबईत आल्यावर रेल्वे स्थानकावर झोपलो आणि उपजीविकेसाठी नृत्याचे प्रशिक्षण मुलांना दिले. या गोष्टींकडे पाहता बॉलीवूडमधील माझा प्रवास फिल्मी असल्याचे मला वाटते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा