‘अॅपल’चे प्रमुख टीम कूक यांच्या दौऱ्यानंतर लगेचच या महिन्याच्या शेवटी ‘मायक्रोसॉफ्ट’चे सीईओ सत्या नाडेला भारत दौऱ्यावर येत आहेत. नाडेला यांचा हा तिसरा भारत दौरा आहे. त्यांच्या दौऱ्याकडे देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यामध्ये ते निवडक उद्योजक आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची भेट घेणार आहेत.
येत्या ३० मे रोजी मायक्रोसॉफ्टतर्फे एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये निमंत्रित करण्यात आलेल्यांबरोबर नाडेला संवाद साधणार आहेत. नाडेला गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर त्यांनी काही कंपन्यांनाही भेट दिली होती. नोव्हेंबरमध्ये त्यांनी मुंबईमध्ये एका कार्यक्रमात भाषणही केले होते. त्यावेळी त्यांनी महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा आणि अॅक्सिस बॅंकेच्या अध्यक्षा शिखा शर्मा यांचीही भेट घेतली होती.

Story img Loader