मराठी चित्रपट आणि नाटक यासाठी देण्यात येणाऱ्या ‘मिक्ता’ पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी दुबईत मराठी कलाकारांची मांदियाळी जमा झाली आहे. शुक्रवार २० फेब्रुवारी रोजी येथील वेळेनुसार म्हणजे सायंकाळी सहा वाजता हा सोहळा रंगणार आहे.
अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या मुख्य संकल्पनेतून साकार झालेल्या या सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष आहे. पहिला ‘मिक्ता’ पुरस्कार वितरण सोहळा दुबई येथेच झाला होता. त्यानंतर लंडन, सिंगापूर, मकाऊ आणि आता पुन्हा दुबई येथे याचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य पुरस्कार वितरण सोहोळ्यात नृत्य, प्रहसन, गाणी यांची मैफल रंगणार आहे. मराठीत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या बहुचर्चित ‘मिक्ता’चे विविध पुरस्कार कोणाला मिळणार त्याकडे कलाकारांसह सर्वाचे लक्ष लागले आहे.
सेलिब्रेटींची क्रिकेट मॅच
महेश मांजरेकर (कप्तान- मिक्ता इलेव्हन) आणि रितेश देशमुख (कप्तान- लई भारी) यांच्या संघात बुधवारी सायंकाळी क्रिकेटचा सामना रंगला. १५ षटकांच्या या सामन्यात ‘लई भारी’ संघ विजयी झाला.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मराठी नाटक, चित्रपट व मालिकांमधील अनेक कलाकार सहभागी झाले होते. रितेशचा ‘लई भारी’ संघ सामन्यात विजयी झाला. अभिनेते जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, ऋषिकेश जोशी यांनी सामन्याचे खुमासदार धावते वर्णन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा