प्रसिद्ध गायक मीका सिंह मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. पंजाबी गायक मीकानं आता लग्न करण्याचा निर्णय घेतला असून एका टीव्ही रिअलिटी शोमधून तो आपल्या जोडीदाराची निवड करणार आहे. मीका सिंहचा ‘स्वयंवर- मीका दी वोटी’ हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या मीका या शोचं प्रमोशन करत असून नुकत्याच एका प्रमोशन इव्हेंटमध्ये पत्रकाराला अपशब्द वापरल्यानं मीका सिंह पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हिंदुस्तान टाइम्स’नं दिलेल्या वृत्तानुसार मीका सिंहनं दिल्लीमध्ये त्याचा शो ‘स्वयंवर- मीका दी वोटी’च्या प्रमोशन कार्यक्रामात एका पत्रकाराला शिवीगाळ केली. वेबसाइटला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना एका बँक्वेट हॉलमध्ये घडली. ज्यावेळी एका पत्रकाराने मीकाला, ‘राखी सावंत या शोमध्ये सहभागी होणार आहे का?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा मीकाला राग अनावर झाला.

आणखी वाचा- पल्लवी जोशी यांना पहिल्या भेटीत अजिबात आवडले नव्हते विवेक अग्निहोत्री, पण…

जेव्हा मीका सिंहला असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो सर्वांसमोर शांत राहिला. मात्र नंतर तो कार्यक्राम सोडून निघून गेला आणि प्रश्न विचारणारा पत्रकार आणि शोच्या टीमला त्यानं एका रुममध्ये बोलावून शिवीगाळ केली. राखी सावंतशी संबंधित प्रश्न विचारल्यानं मीका सिंहला राग अनावर झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार मीका म्हणाला की, ‘तिची तुलना कोणाशी केली जाऊ शकत नाही.’ त्यानंतर मीकानं इतर पत्रकारांनाही मुलाखत देण्यास नकार दिला.

आणखी वाचा- सलमान- अक्षय- सैफ पोहोचले शाहरुख खानच्या ‘मन्नत’वर, वाचा नेमकं काय घडलं

काही वेळानं ‘स्वयंवर- मीका दी वोटी’च्या टीमनं संबंधित पत्रकाराची माफी मागतली आणि बंद रुममध्ये जी काही चर्चा झाली ती बाहेर कुठेही लीक होऊ न देण्याची विनंती देखील केली. दरम्यान मीका सिंह आणि राखी सावंत यांच्या २००६ साली एका मोठा वाद झाला होता. स्वतःच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मीकानं राखीला बळजबरीनं किस केलं होतं. ज्यामुळे त्याला कायेदशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mika singh lost his calm during swayamvar mika di vohti promotion and abuse to journalist mrj