बॉलिवूड आणि पंजाबी गायक मिका सिंग हा मनोरंजन सृष्टीतील एक आघाडीचा गायक म्हणून ओळखला जातो. त्याच्या हटके गाण्यांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चा असतात. अलीकडेच मिका सिंग ‘स्वयंवर: मिका दी वोहती’मध्ये आकांक्षा पुरी हिची लग्नासाठी निवड केल्यामुळे चर्चेत आला होता. आता मिका एका वेगळ्याच करणाने चर्चेचा विषय ठरत आहे. याचे कारण म्हणजे मिका सिंगने एक खासगी बेट विकत घेतले आहे. मिका सिंग सध्या खाजगी बेटावर वेळ घालवत आहे.

आणखी वाचा : ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ऐश्वर्या रायच्या अनुपस्थितीचे कारण सलमान खान ?, चर्चांना उधाण

bigg boss marathi mira jagannath slams ankita walawalkar
“असं नको खेळू, तसं नको…”, सूरजला सल्ले देणाऱ्या अंकितावर मराठी अभिनेत्री संतापली; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
sunita ahuja converted to Christianity for wine
वाईन पिण्यासाठी स्वीकारला ख्रिश्चन धर्म, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा…
bigg boss marathi utkarsh shinde praises arbaz patel
“मिस्टर युनिव्हर्सला धाप लागली…”, संग्रामला टोला, तर अरबाजच्या खेळाचं कौतुक; उत्कर्ष शिंदेच्या पोस्टने वेधलं लक्ष
kirron kher opens about battling with cancer
कर्करोगाचे निदान झाल्यावरही किरण खेर यांनी केलेलं ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चं चित्रीकरण, म्हणाल्या, “मी तो शो सोडू शकत नव्हते, कारण….”
Appi Aamchi Collector
Video: ‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये मोठा ट्विस्ट; अप्पी आणि अर्जुन होणार वेगळे, अमोलची देवाला प्रार्थना म्हणाला, “मला काही झालं…”
Jaya Bachchan Father on daughter wedding with amitabh bachchan
अमिताभ बच्चन-जया यांचे आंतरजातीय लग्न लावण्यास भटजीने दिलेला नकार; बिग बींचे सासरे म्हणाले होते, “लग्नाचे विधी…”
Choreographer Arrested in Rape Case
Jani Master : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोरिओग्राफरला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक, पोलिसांची मोठी कारवाई
Upendra Limaye Impresses Fans with Tasha Performance
Video : गुलालाची उधळण अन् उपेंद्र लिमयेंनी वाजवला ताशा, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, “मातीतला कलाकार…”
navra maza navsacha 2 movie quiz
नवरा माझा नवसाचा २ : लोकसत्ताचं Quiz सोडवा आणि चित्रपटही पाहा, सचिन पिळगांवकरांनी केलं आवाहन

मिका सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो बोट चालवताना दिसत आहे. तर त्यांचे अंगरक्षक किनाऱ्यावर उभे आहेत. बोटीवर MS लिहिले आहे म्हणजेच मिका सिंग. मिका सिंग हा पहिला भारतीय गायक आहे ज्याने स्वतःचे खाजगी बेट विकत घेतले आहे. यासोबतच मिका सिंगने ७ बोटी आणि १० घोडे देखील खरेदी केले आहेत. किंग साइज लाइफ जगणारा मिका सिंग आलिशान घरे आणि वाहनांचा मालक आहे. मिका सिंगला त्याच्या स्वतःच्या मालकीच्या बेटावर पाहून चाहते त्याचे खूप खूश आहेत.

एका चाहत्याने लिहिले, “मिका पाजी, सिंग इज किंगचे आयुष्य जगणारे तुम्हीच आहात.” आणखी एका चाहत्याने त्याचे अभिनंदन केले आणि सांगितले की, “आणखी काही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आम्हाला तुमच्या खाजगी बेटाची झलक मिळू शकेल.”

हेही वाचा : Mika Singh Birthday Special : दुबईत तुरुंगवास ते राखी सावंत Kiss प्रकरण; गाण्यांपेक्षा वादांमुळेच अधिक चर्चेत असणारा गायक

मिका सिंग हा एक भारतीय पॉप गायक आणि रॅपर आहे. अनेक बंगाली चित्रपटांनाही त्यांनी आवाज दिला आहे. मिका सिंग पंजाबी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध गायक आहे. मिका सिंगने ‘सिंग इज किंग’ आणि ‘जब वी मेट’सह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.