प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येच्या वृत्तानं सर्वांनाच धक्का बसला आहे. २९ मे रोजी २८ वर्षीय गायकाची काही हल्लेखोरांनी ३० राउंड फायर करून हत्त्या केली. सिद्धू मूसेवालाला रुग्णालयात भरती केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. शहनाझ गिल, मुनव्वर फारूखी, आसिम रियाजसहित बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे. अशात आता गायक मीका सिंगनं देखील सिद्धूसोबतचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.

मीका सिंगने त्याच्या इन्स्टाग्रामवर सिद्धू सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात एका पार्टीमध्ये मीका आणि सिद्धू डायनिंग टेबलवर बसलेले दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना मीका सिंगनं लिहिलं, “मी नेहमीच म्हणतो की, मला पंजाबी असल्याचा गर्व वाटतो. पण आज मला असं म्हणताना लाज वाटतेय. २८ वर्षांचा एक मुलगा जो एवढा प्रसिद्ध होता. ज्याचं भविष्य एवढं चांगलं होतं. पण त्याची पंजाबमध्ये पंजाबी लोकांनीच हत्या केली. देव त्याच्या आत्म्यासा शांती देवो. त्याच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. मी पंजाब सरकरला विनंती करतो की त्यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी.”

आणखी वाचा- “मला चुकीचे समजू नका…”, सिद्धू मुसेवाला यांची शेवटची पोस्ट चर्चेत

याशिवाय मीका सिंगनं सिद्धू मूसेवालासोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, “तुझी खूप आठवण येतेय भाई. तू खूप लवकर निघून गेलास. तू तुझं काम, गाणी, तू कमावलेली प्रसिद्धी आणि हिट रेकॉर्ड्समुळे नेहमीच सर्वांच्या आठवणीत जिवंत राहशील. तुझी हिट लाइन #Dildanimadasidhumussewala ला तुझे चाहते नेहमीच लक्षात ठेवतील. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो. सतनाम वाहेगुरू.”

आणखी वाचा- “आणखी एका आईचा…”, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सोनू सूद भावूक

दरम्यान पंजाबचा गायक सिद्धू मुसेवालाची रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानसाच्या जवाहर गावाजवळ मूसेवालावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर, मुसेवाला याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत मुसेवालासोबत असलेले आणखी दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धू मुसेवालाची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशीच त्याची हत्या करण्यात आली.

Story img Loader