पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने आपला मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली. ‘बेबी डॉल’ या आयटम साँगने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर तिचे आयुष्यच बदलले. नुकताच सनीने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘कपिल शर्मा’मध्ये हजेरी लावली. तिच्यासोबत बॉलिवूड गायक मिका सिंगदेखील होता. दरम्यान, मिकाने एकदा पहाटे चार वाजता सनीच्या घरी गेल्याचे सांगितले. तसेच त्यावेळी सनीचा पती डॅनियलची प्रतिक्रिया कशी होती हे देखील सांगितले आहे.
मिका या प्रसंगा विषयी बोलताना म्हणाला, ‘अमेरिकेतील लॉस एन्जलिसमध्ये माझा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम रात्री ११.३० वाजता संपणार होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर मी सनीला भेटण्यासाठी तिच्या घरी जाणार होतो. पण कार्यक्रम खूप उशिरा संपला. मला सनीच्या घरी पोहोचायला पहाटेचे ४ वाजले. मला दार वाजवताना फार विचित्र वाटत होते.’
आणखी वाचा : 1062, लग्नाची तारीख की रुम नंबर? काय आहे अथियाच्या कमेंट मागचं सिक्रेट
पुढे तो म्हणाला, ‘मी दार वाजवल्यानंतर त्यांना सर्वात पहिले कोणताही गैरसमज करु नका असे म्हटले. सनीचा नवरा डॅनिअल खूप चांगला आहे. त्याने मला एकही प्रश्न न विचारता घरात बोलावले. पहाटे ४ वाजता माझ्यासाठी पिझ्झा आणि कॉफी केली.’