छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील प्रत्येक भूमिका आणि कलाकार प्रेक्षकांची मने जिंकली. मालिकेतील अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी तर नेहमीच चर्चेत असतो. मिलिंद सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच मिलिंदने सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर सकाळपासून रात्री पॅकअपर्यंतची सगळी दृश्ये या व्हिडीओत पाहायला मिळतात. हा व्हिडीओ शेअर करत “२०१९ पासून सुरु असलेल्या या मालिकेची एक झलक, आमचे कॅमेरा मॅन राजु देसाई आणि त्यांच्या लाइटमनच्या टीमची एक झलक. कॅमेऱ्यात जे काही कैद झालं त्याची एक झलक. ज्याचा हा बीहाइंड द सीनचा व्हिडीओ आहे. ‘आई कुठे काय करते’चे एक सुंदर जग. दिग्दर्शक, कॅमेरा मॅन, निर्माते, मेकअप, कॉस्च्यूम आणि कलाकार, स्पॉटबॉय या सगळ्यांमधील चांगला सुसंवाद आहे”, असे मिलिंद म्हणाला.
आणखी वाचा : करिश्मा कपूर पुन्हा होणार नवरी? ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधान
पुढे मिलिंद म्हणाला, “मला लहानपणापासून शूटिंग पाहायला आवडतं. मला हे स्वप्नांचं जग आवडतं. जरी ही मालिका काल्पनिक कथेवर असली तरीही आमच्या मालिकेतील सर्व पात्रं ही घरोघरी नावारूपास आली आहेत. लोकांना आता ही पात्रं आपलीशी वाटतात. २०१९ नोव्हेंबरमध्ये या सगळ्या पात्रांचा जन्म झाला.”
आणखी वाचा : बॉलिवूड अभिनेत्रींचे स्टायलिश मंगळसूत्र पाहिलेत का?
पुढे मिलिंद म्हणाला, “अरुंधती, संजना, आप्पा, कांचन, आई, यश, अनघा, विमल, अभिषेक, ईशा, आशुतोष, सुलेखा ताई, अविनाश, नितिन शाह, शेखर, कादर, विशाथा, गौरी, विद्याताई आणि अशी बरीच पात्रं आणि माझं देखील अनिरुद्ध देशमुख ही नावं २०१९ आधी कधीच ऐकली नाहीत आणि अनिरुद्ध किंवा अन्या ही नावं माझ्यासोबत जोडली गेली आणि आयुष्यभर मी या नावाने ओळखला जाईल.”