मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार मिलिंद व राणी गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी हा नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. गुणाजीने राधा पाटील सोबत लग्न केले आहे. या दोघांच्या जोडप्याची चर्चा ही त्यांच्या साखरपुड्याच्या बातमी नंतर चांगलीच रंगली होती. त्यांचे सोशल मीडियाफोर अनेक फोटो व्हायरल झाले होते. अभिषेक आणि राधा यांचा विवाह मालवण येथे नयनरम्य वातावरणात पार पडला.

मिलिंद आणि राणी गुणाजी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकार व सुत्रसंचालक म्हणून ओळखले आहेत. त्यांनी आपले आशीर्वाद देत अभिषेक आणि राधा यांच्या ‘अनोख्या डेस्टिनेशन वेडिंग’ संकल्पनेचे कौतुक केले आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रातील निसर्ग आणि साधेपणाची संस्कृती जपत लग्न करण्याचा निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला.

hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
Muslim father card printed for hindu people at daughter wedding faces of hindu lord in amethi goes viral
PHOTO: मुस्लिम बापाकडून लेकीच्या लग्नात हिंदूंसाठी खास निमंत्रण; पत्रिकेवरील एका गोष्टीनं वेधलं लक्ष; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem
Video : ठरलं! मृणाल दुसानिसची नवीन मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये झळकणार ‘हे’ दमदार कलाकार
Video Viral
“आयुष्यात कितीही मोठे व्हा पण वडिलांचे कष्ट कधी विसरू नका” बाप लेकीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
a daughter angry on his father for Spreading things in the house
“नुसता पसारा करतात…” चिमुकलीने काढली वडीलांची खरडपट्टी, Video होतोय व्हायरल

आणखी वाचा : फोटो काढण्यासाठी आलेल्या पोलिसाला हटकल्यानंतर ; अक्षयने केलेल्या कृत्याचे होतयं कौतुक

मिलिंद म्हणतात, “आम्ही एक कुटुंब म्हणून आपली संस्कृती आणि वारसा जपला आहे. म्हणून आम्ही वालावल, मालवण येथे खाजगी समारंभ करण्याचे निवडले आहे. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सौंदर्याचा, अतुलनीय पर्यटनस्थळांचा आणि अजोड गडकिल्ल्यांच्या खजिन्याचा मी नेहमीच प्रचार करत आलोय. महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीने लग्नसोहळा व्हावा अशी आमची इच्छा होती. हा महत्वाचा संदेश आपल्या स्वतःच्या जीवनशैलीतून देण्याचा हा आमचा एक प्रयत्न होता. महाराष्ट्रात असलेली पर्यटन स्थळे परदेशातल्या पर्यटनस्थळांच्या तोडीची आहेत. त्यामुळे अशाच सुंदर डेस्टिनेशन वर हा लग्नसोहळा करण्याचे ठरले.”

आणखी वाचा : “मी आता हे करू शकत नाही…”, लग्नाच्या एक महिन्यानंतर जिनिलियाने रडत रडत रितेशकडे केली होती तक्रार

अभिषेक हा आय.टी. अभियंता आहे, जो आता चित्रपट आणि निर्मितीच्या प्रेमात पडला होता. अभिषेकाची पत्नी राधा सुद्धा मुंबईत फार्मा क्षेत्रात काम करत आहे. अभिषेकने अलीकडेच सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी यांच्या सोबत ‘छल’ हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या लघुपटाला बर्लिन फ्लॅश फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले आहे. या व्यतिरिक्त अभिषेक व्यावसायिक जाहिरातींसाठी देखील काम करत आहे.