अभिनेता मिलिंद सोमण हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. कधी मॅरेथॉनमधील सहभागामुळे तर कधी नातेसंबंधांमुळे. याच नातेसंबंधांबाबत मिलिंद सोमण याने एक विधान केले आहे. त्याची पत्नी अंकिता कोनवार हिच्याशी काही महिन्यांपूर्वीच लग्न केले आहे. त्या दोघांच्या वयात बरेच अंतर असून तो ५३ वर्षाचा तर ती २८ वर्षांची आहे. त्यांच्या वयातील अंतरामुळे त्यांच्या या नात्याबाबत खूप चर्चा होताना दिसतात. या दोघांच्या रिलेशनशिपपासून ते त्यांच्या लग्नापर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली. मिलिंदनेही त्याचं नातं जगापासून न लपवता ते सर्वांसमोर खुलेपणाने मांडलं. अनेकांनी त्यांच्या नात्यावर प्रश्नही उपस्थित केले. बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतेच एका मुलाखतीत त्याने आपल्या आणि पत्नी अंकिताच्या वयाबाबत एक वक्तव्य केले. आमच्या दोघांच्या वयातील अंतर मी मानत नाही. दोन लोक वय, अनुभव, पार्श्वभूमी, संस्कृती याच्या बाबतीत कायमच वेगळे असणार. पण या सगळ्या गोष्टी समजून घेणे आणि मान्य करणे जास्त महत्त्वाचे आहे. तुमचे नाते सशक्त, सकारात्मक आणि चांगले राहायचे असेल तर तुम्हाला तुमच्या काही सवयी सोडाव्या लागतात. असे केले तरच तुमचा जोडीदार तुमच्यासोबत जुळवून घेऊ शकतो आणि याचा जोडीदाराला आपले ध्येय गाठण्यात नक्की उपयोग होतो. याचवेळी आपण कामाच्या निमित्ताने महिन्यातील २० दिवस फिरतीवर असल्याचेही त्याने सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milind soman finally opens up about the age gap with wife ankita konwar