बॉलिवूड अभिनेता आणि सुपर मॉडल मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. मिलिंद सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तो फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अनेकवेळा त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मात्र, यावेळी मिलिंद त्याच्या आईमुळे चर्चेत आला आहे.
मिलिंदने त्याच्या आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. उषा उषा सोमण वयाच्या ८३ व्या वर्षीही खूप तंदुरुस्त आहेत आणि २५ वर्षांनंतर त्यांनी बीचवर सायकलिंग करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मिलिंदने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : या ४ अक्षरांच्या स्त्रिया पतीला बनवतात श्रीमंत, जाणून घ्या त्यांच्याविषयी
मिलिंदने त्याच्या आईचा हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. फक्त फोटो नाही तर व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याच उषा सोमण बीचवर सायकल चालवताना दिसत आहेत. यावेळी मिलिंद त्यांच्या खांद्यावर हात ठेवून धावत असल्याचे दिसत आहे. तो त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ शेअर करत आई २५ वर्षांनंतर सायकल चालवते. तुम्हाला जे आवडतं ते करा पण नियमीत सराव करा, ८३ व्या वर्षी हे इतकं वाईट नाही आहे.
आणखी वाचा : “…म्हणून मी कधीही सेकंड लीड करणार नाही”, जॉन अब्राहमचे वक्तव्य चर्चेच
मिलिंद सोमणच्या आईच्या या व्हिडिओवर चाहते कमेंट करत त्यांचं कौतुक करत आहे. अंकिता कोंवरनेही या व्हिडीओवर कमेंट करत सासूचा फिटनेस पाहून स्तुती केली आहे.