राजकीय आणि सामाजिक वास्तवाचे दर्शन घडविणारा राजकीय चित्रपट म्हणून पाहिल्या जाणाऱया आगामी ‘नागरिक’ या चित्रपटातील अभिनेता मिलिंद सोमण यांची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मिळतीजुळती असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटातून बऱयाच वर्षांनंतर अभिनेता मिलिंद सोमण चित्रपटसृष्टीत पुनरागमन करताना दिसेल.
बहुचर्चित ‘नागरिक’ मध्ये समाज व्यवस्थेचे भेदक दर्शन
‘नागरिक’ या चित्रपटाला राज्य शासनाचे पाच पुरस्कार जाहीर झाल्यानंतर हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आहे. येत्या 12 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मिलिंद सोमण राजकीय नेत्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटात सोमण यांचे काही वादग्रस्त संवाद आधीच चर्चेचा विषय बनले आहेत. चित्रपटात आपण एका राजकीय नेत्याची भूमिका साकारत असून माझी भूमिका आणि राज ठाकरे यांच्यात साम्य असल्याचे काहींना वाटत असेल तर ते चित्रपटातील माझा लूक, राजकीय महत्त्वाकांक्षा, शिक्षण, संगोपन यांत साम्य असल्यामूळे असू शकते, असे सोमण यांचे म्हणणे आहे.
८६ व्या वर्षीही श्रीराम लागू ‘इन अ‍ॅक्शन’!
दरम्यान, नागरिक या चित्रपटात मिलिंद सोमण यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर, सचिन खेडेकर यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटात सचिन खेडेकर पत्रकाराच्या भूमिकेत असणार आहेत. चित्रपटाचे निर्माते सचिन चव्हाण हे असून कथा व संवाद डॉ. महेश केळुस्कर यांचे आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन जयप्रद देसाई असून पटकथा डॉ. केळुस्कर व जयप्रद यांनी लिहीली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा