९० च्या दशकातील स्टार अभिनेता मिलिंद सोमण आजही त्याच्या फिटनेस आणि खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. चित्रपट, वेब सिरिज अशा विविध माध्यमात भूमिका साकारणारा हाच फिटनेस फ्रिक अभिनेत्याने आता पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधून घेतलं आहे. यावेळी मात्र त्याचं कारण वेगळं आहे.

हेही वाचा : न्यूड फोटोशूट प्रकरण : रणवीर सिंग पोलिसांसमोर जबाब नोंदवताना म्हणाला, “त्या फोटोंमध्ये…”

Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
third party organizations will do scrap disposal appointment of three organizations after tender process
त्रयस्थ संस्थांकडे भंगार विल्हेवाट, निविदा प्रक्रियेअंती तीन संस्थांची नियुक्ती
in Mumbai 55 percent increase in price of affordable homes
मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या किमतीत ५५ टक्के वाढ!
CIDCO considers extending lottery process for 26 000 houses under My Favorite CIDCO House scheme
२६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेस मुदतवाढीचा प्रस्ताव विचाराधीन
Panvel Virar House expensive , House expensive Panvel,
पाच वर्षात पनवेल, विरारची घरे महागली; दोन्ही ठिकाणच्या किमतीत ५८ टक्क्यांनी वाढ
Suspicion of explosives in air-conditioned coach of Dakshin Express panic among passengers
दक्षिण एक्स्प्रेसमध्ये तीन तास जीव मुठीत… प्रवाशांना अक्षरश: उड्या…
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
देवेंद्र फडणवीस येती घरा…तोची …

अभिनेता मिलिंद सोमण याने मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये एक नवीन आलिशान घर खरेदी केली आहे. त्याचे हे सी-फेसिंग घर ४ बीएचके असून या घराची जागा १७२० स्क्वेअर फीट आहे. त्याचे हे घर दादर बीचच्या अगदी जवळ आहे. तसेच प्रभादेवी परिसरात हे घर असल्याने तेथून सिद्धिविनायक मंदिरही अगदी जवळ आहे. मिलिंदचे हे नवे घर सूरज इस्टेट डेव्हलपर्स लिमिटेडच्या ‘ओशन स्टार’ या स्टँडअलोन टॉवरमध्ये आहे.

या आलिशान घरेचे इंटीरिअरही खूप स्पेशल आहे. या घराला इटालियन मार्बल फ्लोरिंग असून घरातल्या सगळ्या लाकडी वस्तू सागवानी लाकडापासून बनवलेल्या आहेत. या घराला दोन पार्किंग लॉट्सचीही सुविधा उपलब्ध आहे. तसेच घरच्या गॅलरीतून अरबी समुद्र आणि वांद्रे वरळी सी-लिंकची निसर्गरम्य दृश्ये दिसतात. या घराची खरी किंमत अजून समोर आली नाहीये. पण ‘ओशन स्टार’च्या ऑफिशिअल वेब साईटवर घरांची किंमत ६.८० कोटींपासून सुरु होते.

आणखी वाचा : “मला पूर्वीसारखी भीती…”, मिलिंद सोमणची पत्नी अंकिताची पोस्ट चर्चेत

मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार यांनी ५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. २२ एप्रिल २०१८ मध्ये दोघांनीही मराठी रितीरिवाजांनुसार अलिबाग येथे लग्न केलं. लवकरच मिलिंद कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसणार आहे.

Story img Loader