बॉलिवूड अभिनेता आणि सुपर मॉडल मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. मिलिंद सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तो फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अनेकवेळा त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मात्र, यावेळी मिलिंद एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. मिलिंदने बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी बोलताना एका महिलेत असलेल्या कोणत्या गोष्टी त्याला आकर्षित करतात हा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मलायका आणि मिलिंद दोघेही ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर’ या शोचे परिक्षक आहेत. यावेळी गप्पा मारत असताना त्या दोघांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी महिलेत असलेली कोणती गोष्ट मिलिंदला आकर्षित करते या विषयी मिलिंदने सांगितले आहे. हे ऐकल्यानंतर मलायकाला देखील धक्का बसला आहे.

मिलिंद म्हणाला, ‘ती सायको असली पाहिजे.’ हे ऐकताच पाठून काही लोक हसताना दिसतात. ‘तिथे कोण हसत आहे? ते क्रुचे लोक आहेत का?’ असा प्रश्न मिलिंदने विचारला तर मलायका म्हणाली, ‘माझ्यासोबत त्यांनाही धक्का बसला आहे.’

मिलिंद पुढे म्हणाला, ‘ती मोठ मोठ्याने ओरडून बोलणारी असली पाहिजे. जसे की मी इथे आहे, अशी असली पाहिजे. अशा प्रकारच्या मुली माझं लक्ष वेधून घेतात.’ मलाकयाची पसंत पूर्णपणे वेगळी होती. ‘अरे बापरे, मला अश्या व्यक्तीसोबत एका खोलीत रहायला नाही आवडणार. मी दुसरीकडे पळून जाईन. कारण अशा व्यक्तीसोबत डेटवर जायला मला आवडणार नाही.’

आणखी वाचा : ‘या’ गोष्टीमुळे समांथा आणि नागा चैतन्यच्या नात्यात पडली फूट?; चर्चांना उधाण

पुढे कोणत्या प्रकारच्या महिलांकडे मिलिंद आकर्षित होत नाही हे सांगत म्हणाला, ‘खोटं बोलणाऱ्या महिला मला आवडत नाही. मला माझी पत्नी अंकिता खूप चांगली ओळखते. तिने सगळे शेड्स पाहिले आहेत.’ पुढे थोडं थांबून मिलिंद म्हणाला ‘ऑफ ग्रे.’

आणखी वाचा : “पुरुषांमधील ‘हे’ ३ गुण मला आकर्षित करतात”, मलायकाने केला खुलासा

पुढे मिलिंदने त्याची पत्नी अंकिताला सगळ्यात शेवटचा मेसेज काय केला ते सांगितले आहे. त्याची लोकेशन. ‘चुकीची लोकेशन, मला खरं सांग मिलिंद तू कुठे आहेस?’ असे म्हणत मलायका मिलिंदची छेड काढत होती. तो हसला आणि स्पष्ट करत म्हणाला, ‘नाही, नाही आज ती सुद्धा प्रवास करत आहे. त्यामुळे आम्ही दोघांनी आमची लोकेशन एकमेकांसोबत शेअर केली आहे.’