काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार हा विमल पान मसालाच्या नवीन जाहिरातीत झळकला होता. या जाहिरातीत शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार असे तिघेही झळकत आहेत. त्यावरून अक्षयला ट्रोल करण्यात येत होते. अखेर अक्षयने या ट्रोलिंगवर उत्तर देत एक मोठी घोषणा केली आहे. अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात अक्षयने त्याच्या सर्व चाहत्यांची माफी मागितली आहे. तसेच यापुढे कोणत्याही तंबाखू ब्रँडची जाहिरात करणार नाही, असेही त्याने सांगितले आहे.
“मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची तसेच तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसात तुमच्या विविध प्रतिक्रिया मी वाचल्या. त्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. मी याआधी कधीही तंबाखू यांसह इतर उत्पादनाचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही.” अशा आशयाची पोस्ट अक्षय कुमारनं सोशल मीडियावर शेअर केली होती. मात्र तरीही त्याला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागत आहे. मात्र अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी मात्र अक्षय कुमार पाठिंबा दिला आहे.
आणखी वाचा- अनुराग कश्यपशी अफेअरच्या चर्चा; अबॉर्शनबद्दल धक्कादायक खुलासा करणारी मंदाना संतापली
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने अक्षय कुमारसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं अक्षय पाठिंबा देताना लिहिलं, ‘अक्षय कुमार, तुझी निवड योग्यच आहे, मग त्याचं कारण काहीही असो.’ मिलिंद सोमणचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. याशिवाय इतरही काही सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अक्षय कुमारला त्याच्या जाहिरात वादात पाठिंबा दिला आहे.
आणखी वाचा- स्वतःपेक्षा २५ वर्षांनी लहान असलेल्या अंकिताला मिलिंद सोमणनं असं केलं होतं प्रपोज
दरम्यान अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचं तर आता त्याच्याकडे बरेच चित्रपट आहेत. अलिकडेच त्यानं भोपाळमध्ये ‘सेल्फी’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. या चित्रपटात इमरान हाश्मी, नुसरत भरूचा आणि डायना पेंटी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय अक्षय कुमारकडे ‘पृथ्वीराज’, ‘रक्षा बंधन’, ‘मिशन सिंड्रेला’ आणि ‘ओएमजी २’ हे चित्रपट देखील आहेत.