९० च्या दशकातील स्टार अभिनेता मिलिंद सोमण आजही त्याच्या फिटनेस आणि खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. मिलिंद सोमणनं चार वर्षांपूर्वी स्वतःपेक्षा २५ वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोनवारशी लग्न केलं होतं. अर्थात या लग्नामुळे मिलिंद आणि अंकिताला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला. आज या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस. त्यानिमित्तानं जाणून घेऊयात या दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात कशी झाली आणि मिलिंद सोमणनं स्वतःपेक्षा लहान असलेल्या अंकिताला कसं प्रपोज केलं होतं.

अंकिता कोनवार आणि मिलिंद सोमण यांची पहिली भेट एका नाइट क्लबमध्ये झाली होती. पहिल्या भेटीतच दोघांचीही नजर एकमेकांवरून हटत नव्हती. शेवटी मग अंकितानं हिंमत करून मिलिंदला डान्ससाठी विचारलं आणि मग बराच वेळ दोघांनी एकमेकांसोबत डान्स केला. त्यानंतर अंकितानं स्वतःच मिलिंदकडे त्याचा नंबर मागितला होता. पण त्यावेळी अंकिता दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

आणखी वाचा- अक्षय कुमार माफी मागितल्यानंतरही होतोय ट्रोल, युजर्स म्हणाले; “हिंमत असेल तर…”

मिलिंद आणि अंकिता एकमेकांचे चांगले मित्र झाले. नंतर दोघांच्या भेटी वाढल्या. पण अशातच अंकितासोबत एक भयानक घटना घडली. ज्यामुळे ती मानसिकरित्या खूपच कोलमडली. अंकिताच्या बॉयफ्रेंडचं निधन झालं होतं आणि तिला या दुःखातून बाहेर पडता येत नव्हतं. अशावेळी मिलिंद सोमणनं तिला खूप आधार दिला. या कठीण काळात त्याने तिला खंबीरपणे पुन्हा उभं राहण्यास मदत केली. त्यानिमित्तानं त्यांच्यातील मैत्री आणखी घट्ट झाली.

आणखी वाचा- Video- शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा चेहरा लपवून पोहोचला एअरपोर्टवर, नेटकरी म्हणतात…

अखेर एक दिवस मिलिंद सोमणनं स्वतःच हिंमत करून अंकिताकडे त्याच्या प्रेमाची कबुली दिली. तो म्हणाला, “जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडलो तेव्हा मी तुझ्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या प्रेमात पडलो. तुझ्या आयुष्यातील त्या घटनेच्याही मी प्रेमात आहे ज्याच्या भूतकाळाचं ओझं घेऊन तू आजही जगत आहेस. त्यामुळे घाबरू नकोस. आपण दोघं मिळून याचा सामना करू.” अशाप्रकारे या दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली. दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि अखेर ५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. २२ एप्रिल २०१८ मध्ये दोघांनीही मराठी रितीरिवाजांनुसार अलिबाग येथे लग्न केलं.

Story img Loader