देशातील पहिला पुरुष सुपर मॉडल म्हणून अभिनेता मिलिंद सोमण ओळखला जातो. मिलिंदची पत्नी अंकिता कोनवार नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. अंकिता कोनवार ही कधी पतीसोबत फिटनेसमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मात्र नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असलेली अंकिता ही सध्या नैराश्याशी झुंज देत आहे. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबतचा धक्कादायक खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अंकिता ही प्रचंड हसताना दिसत आहे. तिच्या हातात ज्यूसचा ग्लास दिसत आहे. तसेच तिच्या आजूबाजूला फळेही दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना अंकिता ही सध्या नैराश्याशी झुंज देत असल्याचे सांगितले आहे. या फोटोमध्ये ती हसताना दिसत असली तरी तिची प्रकृती ठीक नसल्याचे सांगत आहे. या फोटोला तिने भलेमोठे कॅप्शन दिले आहे.

“काही दिवसांपूर्वी काढलेला एक फोटो. ज्यावेळी माझ्या डोक्यात विचारांचे वादळ सुरु होते. पण चेहऱ्यावर मात्र एक हसू आणि शांती होती. होय, अजून काही दिवस आहेत. पण अजूनही सर्व काही ठीक नाही. प्रत्येक व्यक्ती जी चांगली दिसते ती खरोखर चांगली असते असं नाही. काही गोष्टी एकाच वेळी जड आणि निरर्थक वाटतात. पण आता मला पूर्वीसारखी भीती वाटत नाही. काही वर्षांपूर्वी दीर्घकाळ चिंता आणि नैराश्याचा सामना केल्यानंतर मला अजूनही त्याचा सामना करावा लागत आहे. जेव्हा मला अंधाराचा सामना करावा लागतो तेव्हा मी रडते. पण मी आता तसा विचार करत जसे पूर्वी करत होती.”

“आता मी अधिक मजबूत, अधिक सकारात्मक झाली आहे. त्यामुळे मला गडद काळाकुट्ट अंधारातून प्रकाश दिसू लागला आहे. आपल्यापैकी काहींना या जगात टिकून राहण्यासाठी बाकीच्यांपेक्षा थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात. हे कोणासाठीही सोपे नसते, तुम्ही फक्त चांगले आणि मजबूत व्हा.”

“पण लढण्याची इच्छाशक्ती आणि धैर्य गोळा करण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही प्रोफेशनल मदत घ्या. सुट्टीचा हंगाम खूप तणावपूर्ण असू शकतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या आठवणी परत आणू शकतो. बर्‍याच गोष्टी तुम्हाला उत्तेजित करू शकतात परंतु त्या कायम ठेवा. सर्व अडथळे असतानाही तुम्ही काय साध्य केले आहे ते पहा,” असे अंकिताने पोस्टमध्ये म्हटले आहे.

Video : हिंदूंच्या भावना दुखावल्याचा सनी लिओनीवर आरोप; गाण्यावर बंदी घालण्याची होतेय मागणी

अंकिता आणि मिलिंदने २०१८ मध्ये लग्न केले. या दोघांच्या वयातील अंतरामुळे ही जोडी फार चर्चेत होती. अंकिता मिलिंदहून वयाने बरीच लहान असल्यामुळे त्याच्यावर अनेकांनी टीकेची झोडही उठवली होती. मात्र या टीकांना न जुमानता मिलिंद-अंकिताने एकमेकांची कायम साथ दिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milind soman wife ankita konwar opens up on her depression and anxiety nrp