Millind Gaba Viral Video : प्रसिद्ध पंजाबी गायक मिलिंद गाबा हा जितका त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असतो तितकाच तो वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी मिलिंद गाबाने गायक अभिजीत भट्टाचार्यवर औकातच्या वक्तव्यावरून टीका केली होती. त्यानंतर आता मिलिंद गाबाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये मिलिंद दारुच्या नशेत टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये हंगामा करत असल्याचं म्हटलं जात आहे.

गायक मिलिंद गाबाचा ( Millind Gaba ) व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलीवूड’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ टी-सीरिजच्या ऑफिसमधला असल्याचा दावा अनेक वृत्तातून करण्यात आला आहे. दारुच्या नशेत मिलिंदने धक्काबुक्की केली आहे. या व्हिडीओत, सर्वजण आधी चर्चा करताना दिसत आहेत. पण काही वेळानंतर अचानक मिलिंद गाबा व बाजूला बसलेल्या व्यक्तीमध्ये वाद सुरू होतात. यावेळी बाजूच्या व्यक्तीसमोर असलेल्या लॅपटॉप आपटून मिलिंद गाबा त्याच्या अंगावर धावून जाताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर त्याला धक्काबुक्की करताना पाहायला मिळत आहे. हा वाद थांबवण्यासाठी उपस्थित असलेली लोक मिलिंद गाबाला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मिलिंदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून तो या व्हिडीओमुळे सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Millind Gaba
Millind Gaba

हेही वाचा – Bigg Boss Marathi : नॉमिनेशवरून योगिता चव्हाण अन् जान्हवी किल्लेकरमध्ये पडली वादाची ठिणगी, पाहा प्रोमो

हेही वाचा – घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान न्यूयॉर्कमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसली ऐश्वर्या राय-बच्चन, प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबरचा फोटो व्हायरल

मिलिंद गाबा कोण आहे?

३३ वर्षांच्या मिलिंद गाबाचं ( Millind Gaba ) नाव पंजाबी संगीत क्षेत्रात खूप नावाजलेलं आहे. ७ नोव्हेंबर १९९० साली नवी दिल्लीत जन्मलेल्या मिलिंदने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटासाठी गाणी गायली आहेत. मिलिंद गाबाचे नेहमी लाइव्ह कॉन्सर्ट हाऊसफुल्ल होतं असतात.

हेही वाचा – ‘हा’ कोणत्या लोकप्रिय मालिकेचा फोटो आहे? ओळखा पाहू, १० वर्षांपूर्वी झाली होती सुपरहिट

अभिजीत भट्टाचार्यच्या वक्तव्यावर मिलिंद गाबा काय म्हणाला होता?

अभिजीत भट्टाचार्य म्हणाला होता की, गायकांनी लग्नात जाऊन गाणी गायली नाही पाहिजेत. यामुळे त्यांचा दर्जा (औकात) घसरतो. या वक्तव्यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिली होती. मिलिंद गाबाने ( Millind Gaba ) अभिजीतचा जुना व्हिडीओ शेअर केला होता; ज्यामध्ये अभिजीत स्वतः एका कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसत होता. हा व्हिडीओ शेअर करत मिलिंद गाबाने अभिजीत भट्टाचार्यवर टीका केली होती.

Story img Loader